Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

अभिनव विद्यालय सरदवाडी येथे योग दिन उत्साहात साजरा…

21 जून 2025 रोजी अभिनव विद्यालय सरदवाडी मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी योग मार्गदर्शक मयूर सुपते उपस्थित होते .त्यांनी शरीर सुदृढ व बळकट होण्यासाठी नियमित व्यायाम, योगा प्राणायाम आवश्यक आहे .तसेच विद्यार्थ्यांनी आहार व व्यायामाकडे लक्ष द्यावे हा संदेश दिला. भारताने ज्ञान व आयुर्वेदाची देणगी जगाला दिलेली आहे हे मनोगतातून त्यांनी … Read more

कोल्हापुरी बंधाऱ्याला भगदाड; पेरणे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान पाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांत संतापाची लाट

कोरेगाव भीमा – प्रतिनिधी (विनायक साबळे) कोरेगाव भीमा आणि पेरणे या गावांदरम्यान भीमा नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याच्या पेरणे बाजूला मोठे भगदाड पडल्याने नदीकाठावरील शेतजमिनी तसेच अनेक गावांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंधाऱ्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्यानेच हे नुकसान झाले असून, या पार्श्वभूमीवर संतप्त शेतकऱ्यांनी पाटबंधारे खात्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, … Read more

ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय हडपसर येथे योग दिन साजरा…

पुणे प्रतिनिधी :सागर पवार आज दि. 21 जुन रोजी. अंतर राष्ट्रीय योग दिन निमित्त ज्ञानप्रबोधिनी माध्यमिक विद्यालय येथे भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला. विशेष आयोजन: या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सरचिटणीस पुणे शहर ओबीसी मोर्चा सौ. स्मिता ताई तुषार गायकवाड यांनी केले. यावेळी … Read more

श्री.दामोदर नामदेव ताठे विद्यालयात योग दिन आनंदी व उत्साही वातावरणात साजरा.

दिनांक:-21 जून 2025 सरदवाडी प्रतिनिधी : दत्तात्रय कर्डिले कारेगाव मधील दामोदर ताठे विद्यालयात योगदिन उत्साहात साजरा करत ,विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. कारेगाव मधील विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला . यात प्रामुख्याने सर्वच विद्यार्थी चा सहभाग होता.त्यात अबनावे हर्षवर्धन,पार्थ पंडित,श्रावणी कोहकडे आणि अदिति गिरी या विद्यार्थ्यानी योग … Read more

सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी.फार्मसी शिरूर च्या मुलींची बाजी…

शिरूर प्रतिनिधी: राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी शिरूर हे पुणे जिल्हातील एक नावाजलेले महाविद्यालय आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, प्रथम वर्षाचा निकाल ९६% व द्वितीय वर्षाचा निकाल ७१% लागला आहे. प्रथम तीन येणाऱ्या … Read more

शिरूरच्या विद्याधाम प्रशाले मध्ये योगदिन उत्साहात संपन्न

शिरूर प्रतिनिधी: शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योगदिन साजरा करत विद्यार्थांना योगाचे महत्त्व पटवून देण्यात आले आहे. शिरूर शहरातील विद्याधाम प्रशाला विद्यालयात योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक करून योग दिन साजरा केला . उपस्थित शिक्षक: यावेळी प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे व पर्यवेक्षक दिगंबर नाईक यांनी आपल्या जीवनातील योगाचे महत्त्व विद्यार्थ्यांपुढे विशद केले.याप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक चंद्रकांत देविकर, … Read more

गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप : कै. विलास चव्हाण यांच्या स्मरणार्थ वर्गमित्रांचा स्तुत्य उपक्रम

शिरूर प्रतिनिधी: श्री धुंदी बाबा विद्यालय, विद्यानगर येथे कै. विलास चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शालेय वर्गमित्रांनी गरजू विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला. कै. विलास चव्हाण हे सामाजिक जाणिवेचे भान ठेवणारे आणि मदतीस नेहमी तत्पर राहणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, त्यांच्या शालेय मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन गरजू विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी वह्या, … Read more

उरुळी कांचन येथे गोरक्षकांचा मोठा कारवाईचा थरार : पाच कंटेनरमधून तब्बल १३५ टन संशयित गोमांस जप्त

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी(विनायक साबळे) उरुळी कांचन परिसरात शुक्रवारी मध्यरात्री मोठी खळबळ उडवणारी घटना घडली. गोरक्षकांनी गोमांस असल्याच्या संशयावरून मांस भरलेले तब्बल पाच मोठे ४० टी एसी कंटेनर उरुळी कांचन पोलीसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई शुक्रवारी (ता. २०) रात्री १ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलिस स्टेशनच्या हद्दीत करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, प्रकरणाची … Read more