प्रतिनिधी:- दत्तात्रय हिरामन कर्डिले
शिरूर : शिरूर तालुक्यातील अवैध दारूविक्रीसह विविध जनहिताच्या प्रश्नांवर तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या पुणे जिल्हाप्रमुख सौ. तृप्ती अजय सरोदे यांच्या नेतृत्वाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले.

तालुक्यातील अवैध दारूविक्रीमुळे महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य आणि सामाजिक स्वास्थ्य धोक्यात येत असल्याची चिंता यावेळी व्यक्त करण्यात आली. अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

“महिलांची सुरक्षा, युवकांचे भविष्य आणि समाजाचे स्वास्थ्य जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. जनहिताच्या प्रश्नांवर शिवसेना महिला आघाडी सदैव आक्रमक भूमिका घेणार असून, प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी,” अशी भूमिका सौ. तृप्ती सरोदे यांनी मांडली.






Users Today : 39
Users Yesterday : 95