प्रतिनिधी संतोष साळुंके
ता.30 मांडवगण फराटा तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे जिल्हा परिषद वडगाव रासाई गट व पंचायत समिती मांडवगण फराटा गणातील मतदारसंघातील समस्या अडीअडचणी किंवा प्रलंबित विकास कामे याबाबत थेट संवाद साधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार यांच्या सुचनेनुसार शनिवार दिनांक 31 ऑक्टोबर 2026 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिरात शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांनी जनसंवाद दौऱ्याचे आयोजन केले आहे .

तसेच मंजूर झालेल्या प्रलंबित कामांना अधिकाऱ्यांसमोर चर्चा करून कामे चालू करण्यात येतील. तसेच प्रस्तावित मंजूर कामे यांचा आढावा या जनसंवाद दौऱ्यामध्ये पाहिला जाईल.तरी सर्व मतदारसंघातील अडीअडचणींना थेट चर्चा करू विकास कामे मार्गी लावण्याचे निवेदन प्रत्येकाने जनसंवाद दौरांमध्ये घेऊन येण्याचे आव्हान आमदार माऊली आबा कटके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.






Users Today : 100
Users Yesterday : 526