शिरूर प्रतिनिधी:
राज्यस्तरीय आदर्श महाविद्यालय पुरस्कार प्राप्त सीताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी शिरूर हे पुणे जिल्हातील एक नावाजलेले महाविद्यालय आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत घेण्यात आलेल्या डी. फार्मसी च्या उन्हाळी परीक्षा २०२५ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, प्रथम वर्षाचा निकाल ९६% व द्वितीय वर्षाचा निकाल ७१% लागला आहे.
प्रथम तीन येणाऱ्या मुली:

या परीक्षेत प्रथम वर्ष डी फार्मसी मध्ये कु. पंचमुख पायल धनंजय ८१.७०%, इचके श्रद्धा चंद्रकांत ८१.६०%, कु.आवटे कृतिका कैलास ८०.६०% व द्वितिय वर्षामध्ये कु.दौंडकर साक्षी संभाजी ८४.५५%, कु.लगड अपर्णा बाबासाहेब ८३.८२%, कु.परमार खुशबू पारस ८१.९१% यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला.
डी फार्मसी दुसऱ्या वर्षात प्रथम तीन मुली:

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र थिटे, सचिव धनंजय थिटे डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ.अमोल शहा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.






Users Today : 544
Users Yesterday : 26