मांडवगण फराटा प्रतिनिधी – संतोष साळुंके.
हृदयविकाराचा तीव्र झटका आलेल्या एका तरुणाला वेळेवर सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) देऊन त्याचे प्राण वाचवणारे आनंद हॉस्पिटलचे डॉ. अतुल सुराणा यांचा माजी सैनिक संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार करण्यात आला.

शुक्रवारी दुपारी १२ वाजता रुग्णालयात आलेल्या एका तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. अत्यंत गंभीर परिस्थितीत डॉ. अतुल सुराणा यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सीपीआर देऊन उपचार सुरू केले. त्यांच्या वेळेवर केलेल्या उपचारांमुळे तरुणाचे प्राण वाचले. या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून डॉ. सुराणा यांचे कौतुक होत आहे.

याच पार्श्वभूमीवर माजी सैनिक संघटना आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक युवक मंडळाच्या वतीने डॉ. अतुल सुराणा यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपत्कालीन परिस्थितीत सीपीआरचे महत्त्व अधोरेखित करत डॉ. सुराणा यांच्या सेवाभावी वृत्तीचे आणि तत्परतेचे कौतुक केले.
या सत्कारप्रसंगी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, छत्रपती शिवाजी चौक युवक मंडळाचे सदस्य यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला नागरिक तसेच डॉ. सुराणा यांचे सहकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मेजर पांडुरंग चौधरी,संजय ढमढेरे ,सोमनाथ फराटे , संभाजी चकोर , शहानुर सैय्यद,गणेश रोमन ,संजय गायकवाड, अमोल गायकवाड ,अंकुश चौघुले तसेच सर्व हॉस्पीटल स्टाफ उपस्थित होते






Users Today : 8
Users Yesterday : 353