शिरूर, प्रतिनिधी :रामलिंग गाव व परिसरात सुरू असलेल्या कथित अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यासंदर्भात विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या शिरूर प्रखंडाच्या वतीने शिरूर पोलीस ठाण्याला लेखी निवेदन देण्यात आले आहे. H
a88dccee-a22c-4464-8e0f-c9bfd9fb56bd
निवेदनात रामलिंग गावातील ओम रुचा कॉलनी परिसरातील एका घरासमोरील कथित अनधिकृत बांधकाम तसेच परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. संबंधित ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे, याची प्रत्यक्ष पाहणी करून सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
eee9e26d-22f8-443f-a38b-92a7d009274e
तसेच परिसरातील नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन संबंधित बाबींची निष्पक्ष चौकशी करावी, आवश्यक पुरावे तपासावेत आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या प्रकरणात उपलब्ध पुरावे, छायाचित्रे आणि इतर संबंधित माहितीच्या आधारे सखोल तपास करून दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे पोलिसांकडे करण्यात आली आहे.
विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी सत्य परिस्थिती स्पष्ट करावी, अशी भूमिका निवेदनात मांडली आहे.
नर बळीचा संशय ?





Users Today : 179
Users Yesterday : 79