प्रतिनिधी.संतोष साळुंके
बाभूळसर बुद्रुक : येथील प्रगतिशील शेतकरी श्री. राजेंद्र व्यंकटराव नागवडे यांचे निमगाव खलू येथे काष्टी-दौंड रस्त्यावर झालेल्या दुचाकी अपघातात दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने बाभूळसर बुद्रुकसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
“इसार पावती (साठेखत) करून दिली… पण आता खरेदीखत (Sale Deed) करून देण्यास नकार देतोय??”
राजेंद्र नागवडे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून परिचित होते. त्यांच्या निधनामुळे नागवडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अपघाती निधनामुळे मित्रपरिवार, नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांमधून शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि भावंडे असा परिवार आहे.

प्रगतिशील शेतकरी राजेंद्र नागवडे यांच्या आकस्मिक निधनाने परिसरात शोककळा पसरली असून, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.





Users Today : 16
Users Yesterday : 388