प्रतिनिधी . संतोष साळुंके
श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा येथील प्रा. राजेंद्र यशवंत कांबळे सर यांचा सेवानिवृत्ती समारंभ शनिवारी श्री वाघेश्वर मंगल कार्यालय येथे उत्साहपूर्ण वातावरणात थाटात पार पडला. विद्यालयातील वीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ते सेवानिवृत्त झाल्याने या कार्यक्रमात त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला.

प्रा. कांबळे सर यांनी आपल्या सेवाकाळात केवळ अध्यापनापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शारीरिक सौष्ठव, व्यायाम आणि क्रीडांचे महत्त्व पटवून देत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, मेहनत, जिद्द आणि आत्मविश्वासाची भावना रुजवली.

विशेष म्हणजे, श्री हनुमान व्यायाम संकुल मांडवगण फराटा येथे त्यांनी अनेक वर्षांपासून असंख्य विद्यार्थ्यांना कुस्तीचे धडे विनामूल्य दिले.
कुस्ती या पारंपरिक खेळाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याबरोबरच त्यांना योग्य मार्गदर्शन करून सक्षम खेळाडू घडविण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या या कार्यातून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि विद्यार्थ्यांविषयीची आत्मीयता दिसून येते.

त्यांच्या प्रदीर्घ सेवाकाळातील शैक्षणिक कार्य, विद्यार्थ्यांप्रती असलेली तळमळ आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल उपस्थितांनी गौरवोद्गार काढले. सेवानिवृत्ती हा सेवाकार्याचा शेवट नसून जीवनातील नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या वेळी सर्व शिक्षक वृंद,प्राचार्य,सामाजिक राजकीय,क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Users Today : 12
Users Yesterday : 32