Breaking News
श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..! विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शिरूर तालुका नाभिक संघटना आक्रमक; आरोपीला कठोर शिक्षेची मागणी! शिरूर तहसीलदार व शिरूर पोलीस स्टेशनला निवेदन; पोस्को कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची मागणी पुणे MPSC सत्याग्रह मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले….

श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालयात वाचन प्रेरणा दिनाची उत्साहात सुरुवात…..!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी :- दत्तात्रय हिरामन कर्डिले.

‘ पुस्तकांसारखा मित्र नाही आणि ज्ञानासारखी संपत्ती नाही ‘ माणसाचे जीवन त्याच्या विचारांवर अवलंबून असते. जसे विचार, तसे आचार आणि जसे आचार, तसे व्यक्तिमत्त्व घडत जाते. चांगली पुस्तके माणसाला सकारात्मक विचार करायला शिकवतात. अडचणी आल्या म्हणून खचून न जाता त्यांचा धैर्याने सामना करण्याची प्रेरणा देतात. अपयशातून शिकण्याची आणि पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ताकद पुस्तकांमधून मिळते.

आज गुरुवार दि.15 ऑक्टोबर रोजी श्री.डी.एन.ताठे माध्यमिक विद्यालय कारेगाव येथे “मिसाईल मॅन ऑफ इंडिया” म्हणजेच डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विद्यालयाचे माजी विद्यार्थी व सध्या विद्यालयात कार्यरत असणारे प्रयोगशाळा परिचर श्री.बाळासाहेब कोहोकडे यांचे सुपुत्र आणि सध्या जि.प.प्राथमिक शाळा कारेगाव व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष अमोल बाळासाहेब कोहोकडे यांनी विद्यालयात 300 पुस्तके भेट देऊन वाचन प्रेरणा दिनाची सुप्रभात केली.
सदर कार्यक्रमास पंचायत समिती शिरूर शिक्षण विभाग बीट कारेगाव च्या केंद्रप्रमुख सौ.आरती खोसे मॅडम यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व पटवून दिले.


तसेच जि.प.प्राथमिक शाळा कारेगाव शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष सूर्यकांत नवले यांनीही विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व पटवून दिले.
सदर कार्यक्रमास विद्यालयाचे माजी विद्यार्थी उद्योजक नवनाथ नवले हेही उपस्थित होते.
विद्यालयातील जेष्ठ शिक्षक खंदारे सर यांनी सर्वांचे स्वागत केले.तसेच विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका श्रीम.कर्पे मॅडम यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
विद्यालयाच्या प्राचार्य श्रीम.झावरे मॅडम यांनी अशाच प्रकारची मदत माजी विद्यार्थांकडून होत रहावी असे आवाहन केले.
विद्यालयातील शिक्षक श्कर्डिले सर,श्रीम.जाधव मॅडम,श्रीम.पवार मॅडम यांनी सर्व विद्यार्थ्यांना वाचनासाठी पुस्तकांचे वाटप केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 4 3 1 8
Users Today : 1
Users Yesterday : 26