पुणे प्रतिनिधी :सागर पवार
वडगाव मावळ
दिनांक :- ५ आॉक्टोंबर २०२६
स्थळ: वडगाव मावळ (पुणे)
पैसा फंड कडून विशाल लॉन्सकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, हा रस्ता आता स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि रस्त्यालगत साचलेले कचऱ्याचे ढीग यामुळे येथे रोज छोटे-मोठे अपघात घडत असून प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांना नाहक मृत्यूला सामोरे जावे लागत आहे.

खड्ड्यांचे साम्राज्य; पाठीचे आजार आणि अपघातांचे सत्र
पैसा फंड ते विशाल लॉन्स या मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून रस्त्याची डागडुजी झालेली नाही. रस्त्यावर केवळ खड्डे नसून, खड्ड्यांमध्ये रस्ता शोधण्याची वेळ चालकांवर आली आहे. दुचाकी चालकांना खड्डे चुकवताना कसरत करावी लागत असून, अचानक गाडी खड्ड्यात गेल्याने अनेक चालक गंभीर जखमी झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना पाठीचे व मणक्याचे आजार जडले असून वाहनांचेही मोठे नुकसान होत आहे. रात्रीच्या वेळी पथदिव्यांचा अभाव असल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.

रस्त्यालगत कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड; दुर्गंधीने नागरिक हैराण
रस्त्याच्या दुरवस्थेसोबतच या मार्गावर आणखी एक गंभीर समस्या म्हणजे रस्त्यालगत टाकला जाणारा कचरा. काही बेशिस्त नागरिकांना कडून रात्रीच्या अंधारात येथे ओला व सुका कचरा आणून टाकला जात आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने तो कुजला असून परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. हा कचरा रस्त्यापर्यंत पसरत असल्याने वाहनचालकांचे नियंत्रण सुटून अपघात होण्याचा धोका वाढत आहे. तसेच, मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढल्याने पादचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप
विशाल लॉन्स येथे लग्नकार्ये व इतर मोठ्या समारंभांसाठी तालुक्यातून नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र, या मुख्य रस्त्याची झालेली दुरवस्था वडगाव मावळच्या स्वच्छतेवर आणि विकासावर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. स्थानिक नगरपंचायत किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत..





Users Today : 4
Users Yesterday : 32