Breaking News
अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन मांडवगण फराटा येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी.संतोष साळुंके

गणेगाव दुमाला : गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी परिसरातील सिद्धिविनायक मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी भाविकांची श्रद्धा असल्याने पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने मंदिरात उपस्थित राहून श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले.

अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी महाआरती झाल्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अन्नदाते सचिन विलासराव कोंडे व नानासाहेब जगदाळे यांच्या सहकार्याने शिपी, आमटी व भाकरी या महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा एक हजारांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला.

पोपटराव भाऊ निंबाळकर यांच्या अथक प्रयत्नातून आणि लोकवर्गणीतून साकारलेले सिद्धिविनायक मंदिर आज परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. अंगारकी चतुर्थीनिमित्त मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 5 9 5
Users Today : 17
Users Yesterday : 693