मांडवगण फराटा प्रतिनिधी. संतोष साळुंके
श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळाच्या वतीने महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संगीत खुर्ची तसेच विविध मनोरंजनात्मक खेळांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.

कार्यक्रमादरम्यान महिलांनी विविध खेळांमध्ये उत्साहाने सहभाग घेत मनमुराद आनंद लुटला. विजेत्या महिलांसाठी पैठणी, डिनर सेट तसेच इतर आकर्षक बक्षिसांची लयलूट करण्यात आली. त्यामुळे कार्यक्रमात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
संगीताच्या तालावर रंगलेल्या संगीत खुर्चीच्या खेळासह विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी महिलांमध्ये चांगलाच उत्साह संचारला. हास्य-विनोद, खेळ आणि आकर्षक बक्षिसांमुळे कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

महिलांना मनोरंजनासोबतच एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवता यावेत, या उद्देशाने श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळाने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतुक केले.
याशिवाय या उत्सवात मंडळाने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून नृत्य स्पर्धा ही ठेवण्यात आल्या होत्या.तसेच राजमाता जिजाऊ मर्दानी आखाड्याचे आयोजन करून ऐतिहासिक तलवारबाजी, लाठी काठी,दांडपट्टा या प्रकारच्या साहसी युद्ध कलेचे प्रात्यक्षिकही सादर केली होती.
धार्मिकता आणि सामाजिक बांधिलकी जपत प्रत्येकवर्षी गणेशोत्सव साजरा करण्यात श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळ नेहमीच अग्रेसर असते.





Users Today : 7
Users Yesterday : 91