वरदविनायक मित्र मंडळाचे समाजाभिमुख धार्मिक कार्यक्रम सामाजिक सलोखा आणि पारंपरिकता जपणारे आदर्श गणेश मंडळ

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी:संतोष बबनराव साळुंके

मांडवगण फराटा परिसरातील वरदविनायक मित्र मंडळ हे सामाजिक सलोखा, धार्मिक परंपरा आणि सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श गणेश मंडळ म्हणून ओळखले जाते. यंदा मंडळाचे बाविसावे वर्ष असून, विविध धार्मिक व समाजाभिमुख कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री वाघेश्वर महाराजांच्या पावन भूमीतील.
वरदविनायक मित्र मंडळाच्या गणरायाबाबत भाविकांमध्ये विशेष श्रद्धा असून, ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी गणरायाची भाविकांमध्ये ओळख आहे. गणेशोत्सवाच्या काळात परिसरातील भाविक मोठ्या संख्येने गणरायाच्या दर्शनासाठी येत असतात.

गणेशोत्सव सुरू झाल्यापासून मंडळाच्या वतीने विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन, तर बुधवारी छोटे माऊली कदम यांचे हरिकीर्तन पार पडले. या धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

दरवर्षी मंडळाच्या वतीने गणेश विसर्जनाची पारंपरिक वाद्ये, आकर्षक विद्युत रोषणाई आणि भक्तिमय वातावरणात भव्य-दिव्य मिरवणूक काढण्यात येते. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा सुरेख संगम साधत होणारी ही मिरवणूक परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरते.

मंडळाच्या कार्यात शरद पाटील फराटे, हनुमंत पाटील फराटे, पै. शिरूर केसरी शिवाजी जगताप, सचिन धोका,सागर वेदपाठक,दिनेश गुप्ता ,विजय वेदपाठक,आणि विनोद टाटीया यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत. सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि धार्मिक संस्कृती जपण्यासाठी मंडळाच्या वतीने सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत.

“पुढील वर्षी यापेक्षाही व्यापक स्वरूपात धार्मिक तसेच धार्मिक प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे,” असे पै. शिरूर केसरी शिवाजी जगताप यांनी पुणे ग्रामीण न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले.
विविधतेतून ऐकता हा आदर्श या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या उपक्रमातून आणि धार्मिक सादरीकरणातून दिसून येतो.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 1 3 2 6
Users Today : 55
Users Yesterday : 34