प्रतिनिधी.संतोष बबन साळुंके
मांडवगण फराटा : डॉ. विखे पाटील हॉस्पिटल आणि श्री किसनभाऊ फराटे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवगण फराटा व परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे
श्री वाघेश्वर मंदिरात आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील अनेक नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

शिबिरामध्ये नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक त्या वैद्यकीय मार्गदर्शनासह मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची निवड करण्यात आली. तसेच गरजू नागरिकांना अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले.

यावेळी श्री किसनभाऊ फराटे प्रतिष्ठानचे कार्यकर्ते समीरभाई फराटे, सागर नाना फराटे, संपत काका फराटे, गणेश माणिक अण्णा फराटे, अभिषेक दरेकर, अभिजित जगताप, सुधाकर जगताप, तसेच श्रीकृष्ण भोसले, सागर वेदपाठक आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गरजू नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या श्री किसन भाऊ फराटे प्रतिष्ठान आयोजित उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.





Users Today : 99
Users Yesterday : 898