शिरूर | प्रतिनिधी.संतोष साळुंके
पुण्यातील विश्रांतवाडी येथे नाभिक समाजातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत शिरूर तालुका नाभिक संघटनेच्या वतीने. अध्यक्ष रामदास जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिरूर तहसीलदार तसेच शिरूर पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले
. या अमानुष कृत्यातील आरोपीला बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण करणाऱ्या पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी ठाम मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना समाजासाठी अत्यंत चिंताजनक असून, अशा घटनांमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणातील पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका शिरूर तालुका नाभिक संघटनेने मांडली.
या वेळी. शिरूर तालुका नाभिक संघटनेचे अध्यक्ष रामदास जाधव, उपाध्यक्ष गोपाळ बंड,दत्तात्रय शिंदे, संघटनेचे सचिव गणपत क्षीरसागर, पश्चिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष दिगंबर घायतडक,बाळासाहेब गायकवाड,पत्रकार संतोष शिंदे,

बाळासाहेब फुलडाळे,सनी थोरात, राजेंद्र आतकर,गोरख गायकवाड,दादासाहेब साळुंके,अमोल जाधव आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पीडितेला न्याय मिळावा, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी!
अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. अशा प्रकरणांमध्ये दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा झाल्यास समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल. त्यामुळे संबंधित प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

या निवेदनातून शिरूर तालुका नाभिक संघटनेने पीडितेला न्याय मिळवून देण्याची आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला कायद्यानुसार कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी शिरूर तालुका नाभिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.





Users Today : 12
Users Yesterday : 110