प्रतिनिधी. संतोष साळुंके
मोबाईलवर बोलणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांवर कठोर कारवाई वाहतूक प्रशासनाने करावी.

वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणाऱ्या बेजबाबदार वाहनचालकांमुळे अपघातांचा धोका वाढत असून, अशा चालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी.
आजच्या डिजिटल युगात मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, हाच मोबाईल वाहन चालवताना वापरला जात असेल, तर तो स्वतःच्या आणि इतरांच्या जीवासाठी धोकादायक ठरू शकतो. दुचाकी असो किंवा चारचाकी, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, मेसेज पाहणे किंवा मोबाईलकडे लक्ष देणे ही अत्यंत निष्काळजी आणि धोकादायक बाब आहे.

औद्योगिक वसाहती मधे प्रचंड अवजड वाहनांची नेहमीच ये जा असते अशा वेळेस कित्येकदा असे दृश्य काही निष्काळजी वाहन चालकांकडे पाहता निदर्शनास येते.
मोबाईलवरील संभाषणात गुंतलेले चालक; इतरांच्या जीवाशी खेळ!
अनेक वाहनचालक रस्त्यावरून जाताना मोबाईलवर बोलण्यात इतके मग्न होतात की, त्यांचे लक्ष रस्त्यावरून हटते. काही चालक अचानक रस्त्याच्या मधोमध वाहन थांबवून मोबाईलवर बोलू लागतात, तर काही जण अत्यंत संथ गतीने वाहन चालवत संभाषण करतात. अशा प्रकारांमुळे मागून येणाऱ्या वाहनचालकांची गैरसोय होते. वाहतुकीचा वेग मंदावतो, वाहतूक कोंडी निर्माण होते आणि अपघात होण्याची शक्यताही वाढते.
एखाद्या चालकाचे क्षणभरासाठी विचलित झालेले लक्ष दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्यावर कायमस्वरूपी परिणाम करू शकते.
नियम धाब्यावर बसवणाऱ्यांवर कठोर कारवाई हवी!
विशेषतः शाळा महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी, वृद्ध,महिला,पादचारी आणि कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांना अशा बेजबाबदार वाहन चालकांचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
मोबाईल फोन पेक्षा जीव महत्वाचा
एका कॉल साठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही
रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षित प्रवास करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन चालकाने जबाबदारीने वाहन चालवावे आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
लक्षात ठेवा.मोबाईल वरील एक कॉल कदाचित अपघातास निमंत्रण देणारा ठरू शकतो.




Users Today : 179
Users Yesterday : 79