Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी : सागर पवार महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने पुन्हा एकदा केले नावलौकिक..

हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येणार आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना सनी विनायक निम्हण (विश्वस्त, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक, पुणे महानगरपालिका) यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता यावे, तसेच आरोग्यदायी आणि सुरक्षित परिसर उपलब्ध व्हावा, हा या स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात नागरिकांनी, शिवभक्तांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सामूहिक सहभागातून मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21