कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने पुन्हा एकदा केले नावलौकिक..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील कारेगाव येथील अक्षरनंदन सेमी स्कूल कारेगाव ,या शाळेने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत,संपूर्ण जिल्ह्यात शाळेच्या विद्यार्थ्यानी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.

नुकत्याच मध्य प्रदेश ,भोपाळ येथे राष्ट्रीय पातळीवरील रायफल शुटिंग च्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

 

भोपाळ या ठिकाणी 69वी शालेय रायफल शूटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. कारेगाव येथील ,कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मधील अनेक विद्यार्थ्यांनी यामध्ये भाग घेतला होता.

3e19e94e-d23d-47d4-8dfe-432fbaeee395
श्रावणी संतोष वाळके या विद्यार्थीनिनी या स्पर्धेत
सुवर्णपदक(Gold)मिळवले तर ,झारखंड रांची येथे आयोजित ६९ वी नॅशनल स्कूल गेम्स २०२५–२६
सायकलिंग स्पर्धेत
शर्व संभाजी वाळके याने रोप्य पदक (silver).मिळवले.

कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व
अक्षरनंदन गुरुकुल स्कूल, कारेगाव येथील सर्व मार्गदर्शक शिक्षक व संस्थेचे अध्यक्ष संग्राम नाथाभाऊ शेवाळे आणि सचिव शुभम सर्जेराव यादव यांच्या प्रयत्नांना मिळालेल्या यशानंतर सर्वच तालुका व जिल्हा स्तरावर त्यांचे व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे .

तसेच संस्थेच्या नावात एक मनाचा तुरा रोवला गेल्याने पालक वर्ग ही आनंदात दिसत असून,शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांचे विशेष आभार मानत असून ,पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 6 9
Users Today : 4
Users Yesterday : 7