Breaking News
दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड *वसुबारस निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य गोमाता पूजन सोहळा उत्साहात संपन्न!* शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न

दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी संतोष साळुंके

मांडवगण फराटा : यंदा परिसरावर दुष्काळाचे सावट असतानाही दिवाळीच्या सणाचा उत्साह मात्र ओसंडून वाहताना दिसत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा येथील मुख्य बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली असून, खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी लगबग सुरू आहे. रंगीबेरंगी रोषणाई, आकर्षक सजावटीच्या वस्तू आणि दुकानांमधील ग्राहकांची वर्दळ यामुळे संपूर्ण बाजारपेठेला दिवाळीचे प्रसन्न आणि चैतन्यमय स्वरूप प्राप्त झाले आहे.

दिवाळी म्हटले की नवीन कपडे, फराळ, मिठाई, आकाशकंदील, पणत्या, रांगोळी आणि फटाके यांची खरेदी आलीच. याच पार्श्वभूमीवर मांडवगण फराटा येथील कापड दुकाने, किराणा दुकाने, मिठाईची दुकाने तसेच फटाक्यांच्या स्टॉलवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. आपल्या कुटुंबीयांसह नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत दाखल होत असून, लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्ये दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे.

विशेषतः सायंकाळच्या वेळेत बाजारपेठेत गर्दीचा ओघ अधिकच वाढत असून, संपूर्ण परिसर गजबजून जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनीही खरेदीसाठी मांडवगण फराटा बाजारपेठेला पसंती दिल्याने स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यापाऱ्यांनीही दिवाळीच्या खरेदीसाठी विविध वस्तूंची आकर्षक मांडणी केली असून, ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकाने सजविण्यात आली आहेत.

एकीकडे अपुऱ्या पावसामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणींचा सामना करत आहे, तर दुसरीकडे परिस्थितीवर मात करत दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिक आपल्या परीने सणाची तयारी करत आहेत. आर्थिक परिस्थितीचे भान राखत आवश्यक वस्तूंची खरेदी केली जात असली, तरी सणाचा उत्साह आणि परंपरा जपण्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 7 0 3 2
Users Today : 58
Users Yesterday : 30