प्रतिनिधी . संतोष साळुंके
मांडवगण फराटा : मांडवगण फराटा येथील इनामदार वस्ती परिसरात बिबट्याच्या वावरामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात बिबट्याची दहशत पसरल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून, शेतकरीही शेतात जाण्यास धास्तावले आहेत.

शेतीची कामे, जनावरांची देखभाल तसेच रात्रीच्या वेळी शेतात पिकास पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
शेतकरी अक्षय फराटे इनामदार .म्हणाले की संबंधित वन खात्याच्या अधिकाऱ्यांना फोन करूनही .अजूनही बिबट्या साठी पिंजरा लावण्यात आला नाही.तसेच दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा त्यांच्या घराच्या अंगणात आणि परिसरात वावर होता.त्यांचा पाळीव श्वान बिबट्याच्या भक्षस्थानी सापडल्याचे त्यांनी सांगितले.

या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने परिसराची पाहणी करून बिबट्याचा शोध घ्यावा, आवश्यक त्या ठिकाणी पिंजरे व कॅमेरे लावावेत, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्यापूर्वी वनविभागाने तातडीने लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी इनामदार वस्ती आणि परिसरातील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.




Users Today : 87
Users Yesterday : 187