दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण पायी दिंडीवारीने शिरूर परिसर भक्तिमय

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
दि. २४ जुलै रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन संचलित आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल, शिरूर येथे आज सकाळी ११.३० वाजता दिव्यांग विद्यार्थ्यांचा पायी दिंडीवारी सोहळा अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्यात दिव्यांग विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी पालखीचे पूजन व आरती करून करण्यात आली. टाळ-मृदंगाचा गजर, विठ्ठल नामाचा जयघोष आणि अभंगांच्या सुरावटीत विद्यार्थ्यांनी भक्तिभावाने पायी दिंडी काढली. विशेष मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद आणि उत्साहाने उपस्थितांचे मन भारावून गेले.

या कार्यक्रमास माझी जिल्हा परिषद सदस्य कोमल ताई वाखारे, पंचायत समितीच्या सभापती सौ. स्वातीताई घावटे,शिरूर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्याताई पाचरणे, जीवन विकास मंदिरचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय रविंद्र धनकसर,नगरसेविका सौ. संगीता मल्लाव, नगरसेविका सौ. स्वाती साठे, नगरसेविका सौ. आयशा सय्यद, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ. प्रिया बिराजदार,आदर्श सरपंच सौ. वर्षाताई काळे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. शशिकलाताई काळे, आकांक्षा फौंडेशन च्या सभासद डॉ. वैशाली साखरे मॅडम,वैशाली ठुबे,सारिका पवार, प्रिया घोडे तसेच विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते पालखीची आरती करून दिंडी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी विशेष मुलांशी संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अशा धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास, समाजात समावेशकतेची भावना दृढ होण्यास आणि भारतीय संस्कृतीची मूल्ये जपण्यास मोठी मदत होत असल्याचे मत व्यक्त केले.

 

यावेळी आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करत संपूर्ण परिसर भक्तिमय केला. पालकांनीही मोठ्या उत्साहाने दिंडीत सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी आणि नागरिकांनी मनापासून कौतुक केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आकांक्षा एज्युकेशनल फाउंडेशन व आकांक्षा स्पेशल चाइल्ड स्कूल यांच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था सातत्याने शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पुनर्वसनात्मक उपक्रम राबवत असून हा दिंडी सोहळा त्याचाच एक प्रेरणादायी भाग ठरला.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 2 3 4
Users Today : 18
Users Yesterday : 127