Breaking News
नातं जिव्हाळ्याचं! सुजाता पवार यांच्या विजयाने सणसवाडीत आनंद सणसवाडी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार रेशन कार्ड कामांसाठी बेकायदेशीर ‘एजंटगिरी’; शिरूर तालुक्यात रेशन दुकानदारच बनले मध्यस्थ! पुण्यात मोफत प्रवासाचे अजितदादांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न व्हावा – अमोल बालवडकर नगरसेवक महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण स्वप्नसुंदरी मी भारताची 2026 मॉडेलिंग शो चे पुणे येथे आयोजन कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ने पुन्हा एकदा केले नावलौकिक..

नातं जिव्हाळ्याचं! सुजाता पवार यांच्या विजयाने सणसवाडीत आनंद सणसवाडी ग्रामस्थांकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार

Facebook
Twitter
WhatsApp

सणसवाडी (ता. शिरूर) पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मांडवण-वडगाव रासाई गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी आणि माजी सभापती सुजाता पवार यांचा सणसवाडी ग्रामस्थांच्या वतीने हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला. पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर आणि सणसवाडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांनी यावेळी पवारांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

रेशन कार्ड कामांसाठी बेकायदेशीर ‘एजंटगिरी’; शिरूर तालुक्यात रेशन दुकानदारच बनले मध्यस्थ!

यावेळी पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य पंडित दरेकर, मार्केट कमिटी संचालक दत्तात्रय हरगुडे, सावता परिषद जिल्हाध्यक्ष गोरक्ष भुजबळ, माजी चेअरमन सुहास दरेकर, उद्योजक निलेश दरेकर, प्रशांत दरेकर, दत्तात्रय शेळके, प्रवीण वाखारे, अनिल गोटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

सत्ता असो वा नसो, जिव्हाळा कायम :

सणसवाडी आणि पवार कुटुंबाचे नाते हे केवळ राजकीय नसून ते अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. माजी आमदार अशोक पवार आणि सुजाता पवार यांनी सणसवाडी परिसराशी नेहमीच कौटुंबिक संबंध जपले आहेत. “सत्ता असो वा नसो, सणसवाडीकरांनी नेहमीच पवार कुटुंबावर मनापासून प्रेम केले आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. सुजाता पवार यांच्या विजयाने हा विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

a9564384-8b19-4ff8-a4ed-72c6dd7aacb6

यावेळी पंडित दरेकर यांच्यासह सणसवाडीतील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी सुजाता पवार यांच्या विजयाचा जल्लोष केला. सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला मांडवण-वडगाव रासाई गटातील मतदारांनी दिलेली ही कौल असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


“सणसवाडी ग्रामस्थांनी दाखवलेला हा जिव्हाळा आणि प्रेम माझ्यासाठी अनमोल आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन तुम्ही दिलेल्या या पाठबळाचा मला सार्थ अभिमान आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या विश्वासाला तडा जाऊ न देता गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.” – सुजाता पवार, नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 6 1 0
Users Today : 9
Users Yesterday : 230