Breaking News
काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध! गोसेवेचा अनोखा वसा! शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांच्याकडून देशी गाईंचे दान; गोसंवर्धनाचा समाजाला प्रेरणादायी संदेश मांडवगण फराटा येथे भव्य विरंगुळा केंद्र भूमिपूजन समारंभ आणि सुलभ शौचालय उद्घाटन समारंभ संपन्न . विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे बारामती इको सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रा.लिमिटेड चे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना… उद्योजकतेचा प्रवास उलगडण्याची संधी…!!! वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके. दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम

गोसेवेचा अनोखा वसा! शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांच्याकडून देशी गाईंचे दान; गोसंवर्धनाचा समाजाला प्रेरणादायी संदेश

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी . संतोष साळुंके

गोमातेचे रक्षण म्हणजे केवळ एका प्राण्याचे संरक्षण नव्हे, तर भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशी गोवंशाचे अस्तित्व जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. याच विचाराला कृतीची जोड देत शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांनी गोसेवा आणि गोसंवर्धनाचा एक प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. देशी गाईंचे महत्त्व पटवून देत त्यांनी गोशाळेला अनेक देशी गाई दान करून गोवंशाच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

आजच्या आधुनिक युगात देशी गोवंशाचे महत्त्व हळूहळू दुर्लक्षित होत असताना पैलवान शिवाजी जगताप यांनी देशी गाईंचे जतन, संगोपन आणि त्यांच्या वंशवृद्धीची गरज अधोरेखित केली आहे. केवळ गाईंचे पूजन करून गोसेवा पूर्ण होत नाही, तर त्यांचे संगोपन करणे, त्यांना चारा-पाणी उपलब्ध करून देणे, आजारी जनावरांची काळजी घेणे आणि देशी गोवंशाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी गोसेवा असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून मिळत आहे.

देशी गाई या भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. शेतीला पूरक असणारे शेणखत, नैसर्गिक शेतीला मिळणारे बळ, दुग्धोत्पादन आणि ग्रामीण स्वरूपातील योगदान नसून देशी गोवंशाच्या भविष्यासाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे.
देशी गाईंचे महत्त्व शब्दात सांगण्यापेक्षा स्वतः कृतीतून योगदान देऊन पटवून देणे महत्त्वाचे आहे.
शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांचा हा उपक्रम समाजाला गोसेवा, गो संरक्षण,गोवंश संवर्धनाचा नवा विचार देणारा ठरत आहे.त्यांच्या या कार्याचा देश देव धर्म या त्रिसूत्री जपणाऱ्या लोकांच्या साठी नक्कीच अनुकरणीय आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 4 6 5
Users Today : 6
Users Yesterday : 175