प्रतिनिधी.संतोष साळुंके
शिरूर तालुक्यातील पूर्व भागातील सुजलाम सुफलाम बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे गाव. तसेच आर्थिक दृष्ट्या सक्षम ग्रामपंचायत मांडवगण फराटा येथील विविध विकास कामांचा शुभारंभ व उद्घाटन घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक लोकनेते .दादा पाटील फराटे,मा व्हा चेअरमन बाबासाहेब फराटे , सरपंच समिक्षाताई अक्षय फराटे पाटील,आदर्श पोलीस पाटील बाबा पाटील फराटे यांच्या हस्ते संपन्न झाला.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पंचायत समिती सदस्या संगिताताई किशोर फराटे,सरपंच समिक्षाताई अक्षय फराटे पाटील ,उपसरपंच भाऊसाहेब कोळपे, सर्वं सदस्य,मा.उपसरपंच महादेव भाऊ फराटे,पंचायत समिती मा सदस्य लक्ष्मण बापू फराटे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आत्माराम बापू फराटे,मा चेअरमन प्रभाकर घाडगे,मा चेअरमन शरद गायकवाड,वाघेश्वर प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर फराटे पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत फराटे,मा उपसरपंच पांडुरंग मोरे, अशोक जगताप, संजय फराटे, कैलास तात्या फराटे ,मा चेअरमन संतोष पाटील फराटे,बिभीषण फराटे,हभप रामभाऊ सुतार,अक्षय पाटील फराटे,राजेंद्र दरेकर,किशोर फराटे, कैलास काका फराटे ,सागर नाना फराटे,रमेश कटारिया, अभिजीत जगताप, राजेंद्र कांबळे , गणेश फराटे ,कॉन्ट्रॅक्टर माऊली तावरे, नवनाथ गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना दादा पाटील फराटे यांनी सांगितले की गावातील जडणघडण करत असताना सर्व घटकांना एकत्र घेऊन विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ,तसेच शिरूर हवेली आमदार माऊली आबा कटके यांच्या माध्यमांतून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये विकास घडवून आला आहे.

यावेळी सुलभ शौचालय विरंगुळा केंद्र तसेच मारुती मंदिर परिसर काँक्रिटीकरण व सुशोभीकरण व भूमिपूजन,उद्घाटन समारंभ करण्यात आले.मनोगतामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष हनुमंत आण्णा फराटे, आदर्श पोलीस पाटील बाबा पाटील फराटे यांनी बोलताना सांगितले की गावची बाजारपेठ मोठी असल्याने आजूबाजूच्या गावांचा संपर्क या गावाला मोठ्या प्रमाणात असल्याने रस्त्यालगत आकर्षक वीज दिवे, पाणी , आरोग्य,रस्ते, गटार लाईन स्वच्छता ,चौक उभारणी, प्रत्येक गावाला जोडणारा रस्त्यांना आकर्षकपणा , त्याच्या गावांचा नावांचा संदर्भ, पंचतारांकित बाजारपेठ आदी सुविधा पूर्ण संबंधी आराखडा तसेच प्रस्तावित बाजार गाळे उभारून सर्वसामान्य व्यावसायिकांना याचा फायदा होईल.

तसेच विकास कामांची पाहणी करताना पंचक्रोशीतील रस्ते याकडे प्राधान्य दिले जाईल. तसेच जगतापवाडी – बाळासाहेब जगताप वस्ती बाभुळसर रस्ता लवकरच मार्गी लावला जाईल असे यावेळी बाबासाहेब फराटे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.






Users Today : 6
Users Yesterday : 175