Breaking News
काष्टीत सदगुरू मोबाईल शॉपीच्या तिसऱ्या शाखेचा भव्य शुभारंभ; ब्रँडेड कंपन्यांचे मोबाईल अगदी स्वस्त दरात उपलब्ध! गोसेवेचा अनोखा वसा! शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांच्याकडून देशी गाईंचे दान; गोसंवर्धनाचा समाजाला प्रेरणादायी संदेश मांडवगण फराटा येथे भव्य विरंगुळा केंद्र भूमिपूजन समारंभ आणि सुलभ शौचालय उद्घाटन समारंभ संपन्न . विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे बारामती इको सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रा.लिमिटेड चे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना… उद्योजकतेचा प्रवास उलगडण्याची संधी…!!! वर्तमानातील नाही तर, भविष्यातील २५ वर्षांच्या विजेच्या गरजांचा विचार! हवेलीसाठी स्वतंत्र वीज वितरण विभागाची मागणी – विद्यमान आमदार माऊली आबा कटके. दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम

विद्या प्रतिष्ठान, बारामती येथे बारामती इको सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी प्रा.लिमिटेड चे अध्यक्ष अभिमन्यू नागवडे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना… उद्योजकतेचा प्रवास उलगडण्याची संधी…!!!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, उद्भवन व उद्योजकता केंद्र (CIIE) आणि विद्या प्रतिष्ठानचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (VIIT), बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘SPPU Startup Talk Series 2.0 – Conversations with Young Entrepreneurs’ या उपक्रमांतर्गत प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचा आनंददायी अनुभव मिळाला.

यावेळी त्यांनी गेल्या १९ वर्षांच्या उद्योजकीय प्रवासातील संघर्ष, अडचणी, आलेली आव्हाने, अपयशातून घेतलेले धडे आणि बारामती इको सिस्टिम्स अँड टेक्नॉलॉजीजच्या माध्यमातून उभारलेला बायोगॅस व नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील व्यवसायाचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला.

🎯 मार्गदर्शनातील प्रमुख विषय :

* नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य संधी कशा ओळखाव्यात?
* व्यवसायाची कल्पना प्रत्यक्षात कशी उतरवावी?
* अपयश आणि अडचणींवर मात कशी करावी?
* जोखीम स्वीकारण्याची आणि निर्णयक्षमता विकसित करण्याची गरज.
* नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि बाजारपेठेतील संधी.
* नोकरी शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजक बनण्याची मानसिकता.

विशेषतः ग्रामीण भागातील एका शेतकरी कुटुंबातून सुरू झालेला उद्योजक अभिमन्यू नागवडे यांचा प्रवास याचा अनुभव वर्णन करताना शेतकऱ्यांच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून उभारलेला व्यवसाय विद्यार्थ्यांसमोर मांडताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

याच कार्यक्रमात श्री. ज्ञानेश्वर बोडके सर, संस्थापक – अभिनव फार्मर्स क्लब, पुणे यांनी कृषी उद्योजकता, आधुनिक शेती, नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि कृषी व्यवसायातील संधी या विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

विद्यार्थीदशेत असल्यापासूनच व्यवसायाचे स्वप्न सत्यात उतरवून एक यशस्वी उद्योग आज व्यापक स्वरूपात बारामती इको सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी च्या रूपाने आज आपल्याला पहावयास मिळत आहे.

उद्योजक अभिमन्यू नागवडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की माझा ठाम विश्वास आहे की, आजच्या तरुणाईमध्ये कल्पकता, क्षमता आणि जिद्द आहे. फक्त योग्य दिशा, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळाली तर प्रत्येक विद्यार्थी एक यशस्वी उद्योजक बनू शकतो.

“स्वप्न मोठे पाहा, ध्येय निश्चित करा, अपयशाला घाबरू नका आणि स्वतःच्या कर्तृत्वावर व्यवसाय उभा करा!”

या सुंदर उपक्रमासाठी विद्या प्रतिष्ठान, VIIT बारामती आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 4 6 5
Users Today : 6
Users Yesterday : 175