Breaking News
दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम नागरिकांच्या मागणीनंतर शिरूर हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांच्या सूचनेनुसार घोड उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू; १५० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात! गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात! बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान! वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव! दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रभाती.’दिवाळी पहाट, भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी. संतोष साळुंके

मांडवगण फराटा : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशाचे नवे शिखर गाठणाऱ्या शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी कु. दिपीका संतोष परदेशी हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२६-२७ च्या शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत १७ वर्षांखालील मुलींच्या स्क्वॅश स्पर्धेसाठी तिची राज्यस्तरावर निवड झाली असून, या यशामुळे प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय क्रीडा स्पर्धेत दिपीकाने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. विभागीय स्पर्धा मंगळवार दि. १७ नोव्हेंबर २०२६ रोजी महाराष्ट्र स्क्वॅश रॅकेट असोसिएशनचे स्क्वॅश कोर्ट, उंड्री, पुणे येथे पार पडली.

शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करावी, या उद्देशाने प्रशालेत सातत्याने प्रोत्साहन दिले जाते. त्याचाच प्रत्यय दिपीकाच्या या यशातून पुन्हा एकदा आला आहे. तिची राज्यस्तरीय निवड ही केवळ तिच्या वैयक्तिक कर्तृत्वाची पावती नसून प्रशालेतील क्रीडा संस्कृती, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे फलित आहे.

दिपीकाच्या या दैदीप्यमान यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष प्रकाश बाफना, संस्थेचे अध्यक्ष धरमचंद फुलफगर, सचिव नंदकुमार निकम, मुख्याध्यापक रामदास चव्हाण, उपमुख्याध्यापक सुभाष पाचकर, पर्यवेक्षिका संपदा वेताळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुधीर फराटे इनामदार, उपाध्यक्ष कालिदास चकोर, पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सुधाकर जगताप यांनी तिचे विशेष अभिनंदन केले. तसेच प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकवर्गातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दिपीकाच्या या यशामागे विभागप्रमुख बी. पी. येवले, स्पर्धाप्रमुख प्रशांत वाळुंज, क्रीडाशिक्षक मिलिंद निंबाळकर, विजय कराळे, नितीन गवळी यांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तिचे वडील संतोष परदेशी यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरले.तिच्या या यशाबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थ व प्रशालेने कौतुक केले.

जिल्हास्तरावरून राज्यस्तरापर्यंतची ही यशस्वी झेप आता आणखी मोठ्या कामगिरीची नांदी ठरो! आगामी राज्यस्तरीय स्पर्धेत दिपीकाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून यशाची नवी पताका फडकवावी आणि प्रशालेचा, गावाचा व परिसराचा नावलौकिक उंचवावा, अशा सदिच्छा व्यक्त करून प्रशालेच्या वतीने तिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 1 7 2
Users Today : 1
Users Yesterday : 86