Breaking News
बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान! वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव! दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रभाती.’दिवाळी पहाट, भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न कानगाव. येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचा बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार! इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी .संतोष साळुंके:

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचा प्रतिष्ठेचा पुरस्कार; राज्यस्तरीय द्वितीय क्रमांकाचा सन्मान

 

मुंबई : शेतकरी, ग्रामीण कुटुंबे आणि ग्रामोद्योग क्षेत्राच्या विकासासाठी करण्यात येणाऱ्या कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली असून, बारामती इको सिस्टीम्सच्या माध्यमातून उद्योजकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या बाभुळसर बु. येथील सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांना महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रतिष्ठेच्या ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६’ने सन्मानित करण्यात आले आहे. सन २०२६ च्या पुरस्कारांमध्ये त्यांनी राज्यस्तरावर द्वितीय क्रमांकाचा मान मिळविला आहे. महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा यांच्या शुभहस्ते मुंबई येथे आयोजित समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने ग्रामोद्योग, उद्योजकता आणि ग्रामीण विकास क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती व संस्थांना गौरविण्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. बायोगॅस क्षेत्रातील कार्य, शेतकऱ्यांसाठी पर्यायी ऊर्जा स्रोतांची उपलब्धता आणि ग्रामीण कुटुंबांच्या विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेण्यात आली आहे.

 

एका छोट्याशा गावातून सुरू झालेला संघर्षमय प्रवास, उद्योजकीय क्षेत्रातील आव्हाने आणि ग्रामीण विकासाचे ध्येय अशा पार्श्वभूमीवर सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या प्रवासात त्यांचे पती उद्योजक श्री. अभिमन्यू रामदास नागवडे यांनी त्यांना खंबीर साथ दिली. शेतकरी विकासाचे स्वप्न उराशी बाळगून कार्यरत असलेल्या अभिमन्यू नागवडे यांच्या सामाजिक व उद्योजकीय वाटचालीत तेजल नागवडे यांचेही महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

बारामती इको सिस्टीम्सच्या माध्यमातून बायोगॅस तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतकऱ्यांना पर्यायी ऊर्जा स्रोत उपलब्ध करून देणे आणि ग्रामीण कुटुंबांच्या आर्थिक व सामाजिक विकासाला हातभार लावण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. या कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही संस्थेसाठी महत्त्वपूर्ण बाब ठरली आहे.

या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल मा. श्री. जिष्णु देव वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या शुभहस्ते सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री मा. उदय सामंत, उद्योग राज्यमंत्री मा. इंद्रनील नाईक, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) मा. रवींद्र साठे उपस्थित होते.

याशिवाय उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग विभागाच्या आयुक्त श्रीमती प्रेरणा देशभ्रतार, विकास आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मण राऊत तसेच अपर जिल्हाधिकारी व सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रवींद्र ठाकरे यांचीही उपस्थिती होती.

सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांच्या या यशामुळे बारामती इको सिस्टीम्सच्या कार्याला राज्यस्तरीय व्यासपीठावर विशेष ओळख मिळाली आहे. ग्रामीण भागातील महिलांसाठी उद्योजकीय संधी, शेतकरी-केंद्रित उद्योग आणि पर्यायी ऊर्जा स्रोतांच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळणारी दिशा या दृष्टीनेही या सन्मानाकडे पाहिले जात आहे.

संघर्ष, कुटुंबाची साथ, उद्योजकीय जिद्द आणि शेतकरी विकासाचा ध्यास यांचा संगम असलेल्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांच्या या यशामुळे बाभुळसर बुद्रुक गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 7 7 4 0
Users Today : 12
Users Yesterday : 106