Breaking News
दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रभाती.’दिवाळी पहाट, भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न कानगाव. येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचा बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार! इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड *वसुबारस निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य गोमाता पूजन सोहळा उत्साहात संपन्न!* शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी.

दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रभाती.’दिवाळी पहाट, भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी.संतोष साळुंके

गणेगाव दुमाला : दिवाळी पाडव्याच्या मंगलप्रभाती आयोजित दिवाळी पहाट — वर्ष तिसरे हा सुरेल भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न झाला. श्री. बाळासाहेब मुगुटराव कोंडे देशमुख आणि सौ. छाया बाळासो कोंडे देशमुख यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम ऋणानुबंध निवास, कोंडे-गरुड वस्ती, एस फोर चारी, गणेगाव दुमाला येथे पार पडला.

संगीत ,भक्ती आणि संस्कृती यांचा संगम घडविणारा हा दिवाळी पहाट, हा कार्यक्रम उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला.

 

गायनाचार्य लहू आबा चोरघे गुरुजी यांच्या सुरेल गायनाने कार्यक्रमाची रंगत वाढली. त्यांच्यासोबत नवोदित बालगायक श्लोक जरांडे यांनी आपल्या सुमधुर आवाजाने उपस्थित रसिकांची मने जिंकली. भजनांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. शुभम बोरावडे यांनी मृदंगाची साथ केली.

कार्यक्रमाला पोपटराव निंबाळकर पाटील, अर्जुन नाना कोंडे देशमुख, राजू आबा कोंडे देशमुख, उद्योजक काकासाहेब खळदकर, बंडू अण्णा कोंडे देशमुख, लक्ष्मणबापू फराटे, सचिन शेलार (मुंबई पोलीस), नितीन साळवे, निलेश जगताप, अनिल निंबाळकर, ह.भ.प. बाळासाहेब भोसले, ह.भ.प. रामदास नागवडे, कुंडलिक भोसले, राहुल कोंडे देशमुख ,राजन गरुड पाटील,बापूराव गरुड पाटील, चंद्रकांत दादा कुदळे (निवृत्त सैनिक) आणि बन्सीलाल जगताप (माजी सरपंच) यांची प्रमुख उपस्थिती होती.

मंगलमय स्वरांच्या साथीने ,आणि भक्तिमय वातावरणाने दिवाळी पहाट हा कार्यक्रम अधिकच आनंददायी आणि संस्मरणीय ठरला.
कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व गायकवृंद,वादक आणि रसिक श्रोते जन यांचे विक्रांत कोंडे देशमुख आणि श्रीकांत कोंडे देशमुख यांनी स्वागत केले.

कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी नाश्ता, दिवाळी फराळ आणि चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. शेवटी श्री. वाल्मीक अण्णा कोंडे देशमुख (गुरुजी) यांनी उपस्थित मान्यवर, कलाकार, आयोजक आणि रसिकांचे आभार मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 7 4 6 7
Users Today : 12
Users Yesterday : 157