Breaking News
गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात! बाभुळसरच्या सौ. तेजल अभिमन्यू नागवडे यांची बायोगॅस क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी; महामहिम राज्यपालांच्या हस्ते ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ प्रदान! वैचारिक मतभेद बाजूला ठेवत सण-उत्सवांतून एकोप्याचा संदेश देणारे आदर्श गाव कानगाव! दिवाळी पाडव्याच्या मंगल प्रभाती.’दिवाळी पहाट, भजनांचा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात उत्साहात संपन्न कानगाव. येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचा बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार! इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गरजू रुग्णांच्या मदतीसाठी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनचा माणुसकीचा हात!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी. संतोष साळुंके

 

अपघातग्रस्त तरुण अनिकेत शेलार यांच्या उपचारासाठी ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत; ‘एक हात मदतीचा’ अभियानाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

मांडवगण फराटा : समाजातील गरीब व गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहावे लागू नये, या उदात्त हेतूने उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनच्या वतीने माणुसकीचा हात पुढे करण्यात आला आहे. अपघातग्रस्त अनिकेत शेलार यांच्या उपचारासाठी फाउंडेशनच्या पुढाकारातून तब्बल ६५ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करून त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचे दर्शन घडले आहे.

मांडवगण फराटा येथील अनिकेत शेलार यांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे यांनी पुढाकार घेत उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनच्या वतीने गावामध्ये ‘एक हात मदतीचा’ हे मदत अभियान राबविण्यात आले.

या अभियानाला गावातील ग्रामस्थ, युवक तसेच मित्रपरिवाराकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी स्वेच्छेने आर्थिक मदत देत या सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदविला. सर्वांच्या सहकार्याने जमा झालेली ६५ हजार रुपयांची रक्कम नोबल हॉस्पिटलमध्ये जाऊन अनिकेत शेलार यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी उपसरपंच पैलवान भाऊसाहेब कोळपे यांनी आपली सामाजिक भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “समाजातील गरीब आणि गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहावे लागू नये, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. गरजूंच्या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. उपसरपंच पै. भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यात गरजूंना शक्य ती मदत केली जाईल.


संकटाच्या काळात एखाद्याला दिलेला मदतीचा हात त्याच्यासाठी मोठा आधार ठरतो. उपसरपंच पै. भाऊसाहेब कोळपे युथ फाउंडेशनने राबवलेल्या या उपक्रमामुळे अनिकेत शेलार या रुग्णास आणि त्यांच्या कुटुंबीयास मोठा दिलासा मिळाला आहे.गावातील तरुणाई ने एकत्र येऊन व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आणि अनुकरणीय असल्याने.परिसरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 8 0 8 5
Users Today : 0
Users Yesterday : 95