दिपीका परदेशीची राज्यस्तरीय स्क्वॅश स्पर्धेसाठी निवड! श्री वाघेश्वर विद्याधामच्या शिरपेचात मानाचा तुरा; क्रीडा क्षेत्रात प्रशालेची यशस्वी घोडदौड कायम
प्रतिनिधी. संतोष साळुंके मांडवगण फराटा : जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम आणि सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर यशाचे नवे शिखर गाठणाऱ्या शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री वाघेश्वर विद्याधाम प्रशालेची गुणवंत विद्यार्थिनी कु. दिपीका संतोष परदेशी हिने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. सन २०२६-२७ च्या शालेय क्रीडा स्पर्धेंतर्गत १७ वर्षांखालील मुलींच्या स्क्वॅश स्पर्धेसाठी तिची राज्यस्तरावर निवड झाली … Read more
