Breaking News
प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात बाभुळसर बु!सार्वजनिक गणपती उत्सव निमित्त आदर्श सरपंच दिपाली महेंद्र नागवडे व महेंद्र नागवडे यांस सत्यनारायण महापूजा आरतीचा मान. श्री वाघेश्वर देवस्थान मित्र मंडळातर्फे महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन

शिरूरच्या ऋषिकेश जाधव यांची वास्तूकला क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक भरारी

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर येथील ऋषिकेश रमेश जाधव यांनी प्रतिकूलतेवर मात करत आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर वास्तूकला क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण करून आपल्या शैक्षणिक प्रवासात उल्लेखनीय यश संपादन केली आहे .त्यांनी 2026 मध्ये मास्टर ऑफ आर्किटेक्चर (M.Arch.)ही पदव्युत्तर पदवी शिक्षण पूर्ण केलीआहे .
ऋषिकेश यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाची सुरुवात विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय, शिरूर येथे केली .इयत्ता पहिलीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण तसेच बारावी सायन्सचे शिक्षण त्यांनी याच संस्थेत पूर्ण केले .शालेय जीवनापासूनच शिक्षणाची भक्कम पायाभरणी झाल्यानंतर त्यांनी वास्तुकला क्षेत्रात करिअर करण्याचा मार्ग स्वीकारला .त्यानंतर पुणे येथील ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर मधून त्यांनी आर्किटेक्चर चे पदवी शिक्षण पूर्ण केले.

वास्तुकला शेत्रातील सखोल ज्ञान आणि कौशल्य आत्मसात करण्याच्या उद्देशाने त्यांनी पुढे COEP पुणे येथून मास्टर ऑफ आर्किटेक्चर ( M.Arch )या पदव्युत्तर अभ्यासक्रमाची निवड केली. 2026 मध्ये हे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत आणखी एक महत्त्वाचा हा टप्पा गाठला आहे.

 


ऋषिकेश यांच्या मागे कुटुंबीयाचे मार्गदर्शन आणि विशेषता वडील रमेश जाधव यांचे शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ योगदान व संस्कार यांचा मोठा वाटा आहे .रमेश जाधव यांनी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या विद्याधाम प्रशाला शिरूर येथे 13 जुन19981 पासून सेवा बजावली असून विद्याधाम प्रशाला शिक्रापूर येथे एक वर्ष सेवा केलीआहे .सध्या ते श्री वाघेश्वर विद्याधाम मांडवगण फराटा येथे विशेष कला शिक्षक म्हणून कार्यरत आहेत .
शिक्षण क्षेत्राशी दीर्घकाळ जोडलेल्या कुटुंबातून आलेल्या ऋषिकेश यांनी वास्तुकले सारख्या सर्जनशील आणि कौशल्याधारित क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाच्या शैक्षणिक परंपरेला पुढे नेले आहे .त्यांच्या या यशामुळे जाधव कुटुंबीय शिक्षक वर्ग मित्रपरिवार आणि शिरूर परिसरात आनंदाचे वातावरण असून त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 8 7 4
Users Today : 4
Users Yesterday : 25