प्रतिनिधी. संतोष साळुंके
ता.16
[करदात्यांना ७३ आकर्षक बक्षिसांची लयलूट; पारदर्शक उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक]
मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे : मांडवगण फराटा ग्रामपंचायतीच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरणाऱ्या ग्रामस्थांसाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य लकी ड्रॉचे बक्षीस वितरण काल सकाळी ११ वाजता श्री क्षेत्र वाघेश्वर मंदिर, मांडवगण फराटा येथे उत्साहात पार पडले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ग्रामपंचायतीच्या वतीने ३१ मार्च २०२६ पर्यंत घरपट्टी व पाणीपट्टी भरलेल्या पात्र ग्रामस्थांचा लकी ड्रॉ काढण्यात आला. कर भरण्यास प्रोत्साहन मिळावे आणि ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीशी अधिकाधिक सहभाग वाढावा, या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला.
या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकासाठी स्कूटर, द्वितीय क्रमांकासाठी एलईडी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी फ्रिज, चतुर्थ क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, पाचव्या क्रमांकासाठी आकर्षक कूलर, तसेच सहाव्या क्रमांकासाठी दोन बक्षिसे देण्यात आली. याशिवाय मिक्सर, पंखे, प्रेशर कुकर आणि भिंतीवरील घड्याळे अशी अनेक बक्षिसे ग्रामस्थांना मिळाली. एकूण ७३ आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले.

या उपक्रमासाठी ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच आणि सर्व सदस्य यांच्या पुढाकाराचे ग्रामस्थांनी कौतुक केले.व कर्मचारी वृंद यांनीही उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

“कर वेळेत भरा आणि ग्रामविकासात सहभागी व्हा” हा संदेश देणाऱ्या या अनोख्या उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये कर भरण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ग्रामपंचायतीच्या या अभिनव संकल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.






Users Today : 9
Users Yesterday : 377