शिरूर बायपास रस्त्यावरील फोडलेल्या दुभाजक ने परत घेतला एक जीव….

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:प्रकाश गवळी
शिरूर मधील नगर पुणे बायपास रोडवर फोडलेल्या दुभाजक ने दोघांचा बळी घेतलेली घटना ताजी असतानाच आज दि.१६/०८/२०२६ रोजी परत एका तरुणाचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. रिलायन्स पंपा पासून विघ्नहर्ता हॉस्पिटल पर्यंत जवळ जवळ सर्व दुभाजक बंद केले आहेत.


दुभाजक बंद करून अपघात कमी होतील अशी अपेक्षा असताना,रोड क्रॉस करण्यासाठी थिटे कॉलेजच्या समोरील सर्विस रोड ने पुलखालून जात हायवे वर जावे लागते,पण पुला खाली जास्त गर्दी होत आहे.कारण सर्वच गाड्या लहान मोठ्या तेथून जात बाबुराव नगर ला किव्हा पुन्हा हायवे वर जातात.

आज अशीच गर्दी पाहून सोमनाथ बोर्हाडे यांनी हायवे पास करण्यासाठी फोडलेल्या दुभाजक मधून जाण्याचा प्रयत्न केला व नगर वरून पुणे कडे जाणाऱ्या चार चाकी गाडीने धडक दिल्याने ते दूर फेकले गेले व त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शिरूर येथील श्री गणेशा हॉस्पिटल येथे नेण्यात आले , तेथे डॉक्टरांनी तातडीने उपचार केले व अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना पुणे येथील रुग्णालयात दाखल करण्यासाठी सांगितले.

पुणे येथे उपचार करण्या साठी घेऊन जात असताना,शिक्रापूर येथे त्यांची प्राणजोत मावळी.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 9 0 9 2
Users Today : 9
Users Yesterday : 377