[संजय जगताप उपाध्यक्ष, सुभाष शितोळे खजिनदार तर माणिक अण्णा फराटे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी.]
प्रतिनिधी. संतोष साळुंके
मांडवगण फराटा, दि. १३ ऑगस्ट २०२६ :
ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची बैठक गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत प्रतिष्ठानच्या आगामी कामकाजासाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थेच्या अध्यक्षपदी श्री. उत्तम भाऊ भीमराव फराटे यांची निवड करण्यात आली.

यावेळी उपाध्यक्षपदी श्री. संजय पोपटराव जगताप, खजिनदारपदी श्री. सुभाष शितोळे, तर सचिवपदी श्री. माणिक अण्णा सदाशिव फराटे यांची नियुक्ती करण्यात आली.
मांडवगण फराटा व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या देणगीतून उभे राहिलेले ज्ञानेश्वर माऊली मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. या मंदिराच्या उभारणीमागे जुन्या काळातील अनेक भाविक, ग्रामस्थ आणि दात्यांचा त्याग, योगदान व आर्थिक सहकार्य लाभले आहे. त्यामुळे मंदिराच्या जतनाबरोबरच त्याचा धार्मिक व सामाजिक वारसा पुढे नेण्याची जबाबदारी नवनियुक्त विश्वस्त मंडळावर सोपविण्यात आली आहे.

बैठकीदरम्यान मागील पदाधिकाऱ्यांनी प्रतिष्ठानच्या कामकाजाची जबाबदारी नव्या विश्वस्तांकडे सोपवली. यावेळी नवनियुक्त सर्व पदाधिकाऱ्यांचा माजी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित ग्रामस्थ व विश्वस्तांनी नव्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून मंदिराच्या धार्मिक परंपरा, व्यवस्थापन आणि भाविकांसाठी आवश्यक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणार असल्याचे सांगण्यात आले.





Users Today : 97
Users Yesterday : 260