Breaking News
आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण पायी दिंडीवारीने शिरूर परिसर भक्तिमय नागरिक ठरले शिक्रापूर पोलिसांचे ‘खरे सहकारी’; सात चोरटे जेरबंद, मदतगार नागरिकांचा सत्कार बाभूळसर बुद्रुक ग्रामपंचायत येथे स्वर्गीय अजित दादा पवार यांची जयंती साजरी. पिंपळसुटी येथे बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू श्री जगन्नाथ रथयात्रा सोहळा पुण्यात जल्लोषात साजरा आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ – इस्कॉन, पुणे यांच्यातर्फे आयोजन ; यंदा तब्बल १ लाख भाविकांना महाप्रसाद

रांजणगाव गणपती – हिवरे – पाबळ – राजगुरूनगर रस्ता दुरुस्तीची मागणी

Facebook
Twitter
WhatsApp

रांजणगाव गणपती प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
रांजणगाव गणपती – हिवरे – पाबळ – राजगुरूनगर हा प्रमुख मार्ग सध्या अत्यंत खराब अवस्थेत असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये कामासाठी जाणारे कर्मचारी, शेतकरी, व्यापारी तसेच शाळकरी विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर प्रवास करत असतात.

Screenshot

मात्र रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता अपघातांचा धोका वाढला असून अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान होत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनचालकांना रस्ता ओळखणे कठीण होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षाही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

एक यशस्वी उद्योजक “अशोक धर्मराज ढाकणे “

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 4 2 6
Users Today : 2
Users Yesterday : 208