Breaking News
इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड *वसुबारस निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य गोमाता पूजन सोहळा उत्साहात संपन्न!* शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार

शिरूर येथे दिनांक २४ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान श्री शिव महापुराण कथेचे आयोजन – प्रकाशभाऊ धारिवाल,उद्योगपती

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर:प्रतिनिधी
शिरूर जिल्हा पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ते २ मार्च दरम्यान भव्य”श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम हा उद्योगपती स्व.रसिकलाल धारिवाल नगरी रामलिंग रोड,शिरुर जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दिनांक २ मार्च २६ या कालावधीत दररोज दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. धारिवाल फाउंडेशन चे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्यप्रसंग, शिवतत्त्वज्ञान, भक्तीमार्ग, तसेच जीवनातील सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथा भक्तांना ऐकण्यास मिळणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रामलिंग रोड, शिरूर ग्रामीण येथे करण्यात आले आहे.

या पवित्र कथेसाठी शिरूर परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी सर्व शिवभक्तांना केले आहे.
या”सर्व विघ्नहर, सर्व मंगलमय अशा या धार्मिक सोहळ्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहावे आणि श्री शिवमहापुराण कथामृताचा लाभ घ्यावा.” या भव्य आयोजनासाठी धारिवाल परिवार उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल,दिनाभाभी धारिवाल, आदित्य धारिवाल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.


शिवकृपा, भक्तीभाव आणि अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाशभाऊ धारिवाल यांनी केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 7 2 4 8
Users Today : 87
Users Yesterday : 187