Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

सुतारवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भव्य पदयात्रा उत्साहात संपन्न … घड्याळ चिन्हाला नागरिकांचा ठाम पाठिंबा…

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी : सागर पवार

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुतारवाडी येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.

आबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पदयात्रेदरम्यान सुतारवाडीतील नागरिकांनी जिव्हाळ्याने स्वागत करत घड्याळ चिन्हासोबत ठाम पाठिंबा व्यक्त केला. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पदयात्रेला विशेष ऊर्जा देणारा ठरला.

पदयात्रेनंतर भैरवनाथ मंदिर, सुतारवाडी येथे सभा संपन्न झाली.
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत सहउमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे,  बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर उपस्थित होते. यावेळी बालम सुतार आणि संतोष तोंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा तसेच विकासाबाबतच्या भावना जाणून घेतल्या.

कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे हा कार्यक्रम प्रभावी ठरला.
येणाऱ्या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर आम्हा चौघांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना करण्यात आले.

सुतारवाडीतील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21