Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरुर तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखा सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरुर | प्रतिनिधी
शिरुर तहसिल कार्यालयातील अभिलेख शाखा सध्या गंभीर संशयाच्या भोवऱ्यात सापडली असून, काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आर्थिक देवाणघेवाण करून खोट्या जन्मनोंदी तयार केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. या प्रकरणाचा लवकरच पर्दाफाश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिरूर मधील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गंभीर गैरप्रकार.. गोरगरीबांची आर्थिक लूट..

शिरुर शहरात अशा प्रकारच्या बोगस नोंदी मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा असून, या कथित साखळीत शिरुर शहरातील काही राजकीय पुढारी तसेच संबंधित खात्यातील कर्मचारी सहभागी असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान, शिरुर मंडल यांनी आवश्यक कागदपत्रांची सखोल तपासणी न करता बोगस पंचनामा व जबाब नोंदवल्याची कुजबुज नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकारामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणाबाबत शिरुर शहरातील काही सामाजिक कार्यकर्त्यांकडे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे सांगण्यात येत असून, हे पुरावे लवकरच संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करण्यात येणार आहेत. चौकशी सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या गंभीर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 9 7
Users Today : 5
Users Yesterday : 21