शिरूर मधील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये गंभीर गैरप्रकार.. गोरगरीबांची आर्थिक लूट..

Facebook
Twitter
WhatsApp

[अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारल्याचा आरोप; मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार]

शिरूर प्रतिनिधी :
शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार नाकारून बळजबरीने हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार शिरूर येथे उघडकीस आला आहे.

7afa2d43-8b4f-444a-859b-aaef29cb4c7e

या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

ढवळगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथील सयाजी तबाजी आडगळे व सौ. सारिका सयाजी आडगळे यांना शुक्रवार, दि. 19 डिसेंबर 2025 रोजी ट्रॅक्टरने धडक दिल्याने भीषण अपघात झालाहोता.या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून सयाजी आडगळे यांच्या डोक्याला जबर मार लागून 19 टाके घालावे लागले.


जखमी रुग्णांना शिरूर येथील रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल तसेच संलग्न ग्रँट मेडिकल फाउंडेशन – रुबी हॉल क्लिनिक, शिरूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने दोन्ही रुग्णांचे मिळून सुमारे 70 हजार रुपयांचे बिल आकारल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही “कार्ड चालत नाही” व “या कार्डावर उपचार होणार नाहीत” असे सांगून मोफत उपचार नाकारण्यात आल्याचे सांगण्यात आले.

याशिवाय बिलातील काही रक्कम रोख स्वरूपात वसूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
हे कुटुंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारे असून अनुसूचित जातीतील मागासवर्गीय आहे. शासनाच्या अपघात व आरोग्य योजनांचा लाभ मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असताना रुग्णालयाने शासनाच्या धोरणांचे उघड उल्लंघन केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे.
या प्रकरणी तात्काळ चौकशी करून रुग्णांकडून आकारलेली रक्कम परत मिळवून द्यावी, दोषी रुग्णालयावर कठोर कारवाई करावी ,तसेच आवश्यक असल्यास रुग्णालयाची शासकीय मान्यता रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी मुख्यमंत्री कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालय व्यवस्थापनाकडे जाब विचारला असता बिलामध्ये मोठी तफावत असल्याचे समोर आले. औषधांच्या किमती बाहेरील मेडिकलच्या तुलनेत रुग्णालयातील मेडिकलमध्ये अनेक पटीने जास्त आकारल्या जात असल्याचेही निदर्शनास आले.
सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांनी सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार करण्यात आला.

त्यामुळे हॉस्पिटल मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस प्रशासनालाही पाचारण करण्यात आले. मात्र, वास्तविक औषधांचे वाढीव दर व रुग्ण शासकीय योजनेत पात्र असल्याचे नाथाभाऊंनी स्पष्टपणे दाखवून दिल्यानंतर रुग्णालय प्रशासनाला कर्मचारी व रुग्णांसमोर माफी मागण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले.
यानंतर रुग्णालय व्यवस्थापन अधिकारी मायकेल पॉल यांनी मुख्य शाखेशी चर्चा करून पुढील काळात औषधांचे दर तसेच डॉक्टरांच्या तपासणी शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले.
तसेच रुग्णालयाच्या दर्शनी भागात धर्मदाय आयुक्त अंतर्गत असल्याचा उल्लेख, मोफत उपचारांची यादी व दर मराठी भाषेमध्ये दर्शनी भागात स्पष्टपणे लावावेत, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला शासकीय योजनांची माहिती व मदत मिळेल अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते नाथाभाऊ पाचर्णे यांनी केली आहे.

या संघर्षामुळे अडागळे कुटुंबाचे तब्बल रुपये ५०,०००/- वाचले असून, संबंधित कुटुंबाने भारतीय बहुजन पालक संघाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
तसेच सरकारी जागेवर चालणाऱ्या कोणत्याही रुग्णालयाने गरीब, गरजू व अपघातग्रस्त रुग्णांची आर्थिक लूट केल्यास संघटना ती कदापि सहन करणार नाही. अशा प्रकारांवर कठोर आंदोलन, कायदेशीर कारवाई होण्यासाठी संबंधित विभागांकडे तक्रारी व पाठपुरावा करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
गरीब, पिडीत व शोषितांच्या न्यायासाठी भारतीय बहुजन पालक संघ सदैव मदतीसाठी सज्ज आहे.

या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी किती ढिसाळ आहे, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 6 9
Users Today : 4
Users Yesterday : 7