सचिन बेंडभर यांना वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याचा वाचनयात्री पुरस्कार जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी:सागर पवार
पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांनी आजपर्यंत एकूण 100 पुस्तकांचे वाचन करून त्यांचे समीक्षण केले आहे. यात बालसाहित्य, कविता संग्रह, कथा संग्रह, कादंबरी आणि ललित अशा अनेक पुस्तकांचे परीक्षण करून विविध वृत्तपत्रांत ते प्रकाशितही केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन वाचन साखळी समुहाच्या मुख्य संयोजिका प्रतिभाताई लोखंडे यांनी त्यांना वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याचा वाचन यात्री पुरस्कार जाहीर केला आहे. रोख रक्कम 2000, पुस्तके, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वाचन साखळी समुह हा गेल्या अनेक वर्षांपासून पुस्तक वाचकांना प्रोत्साहन देऊन वाचन चळवळ मोठ्या प्रमाणावर वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
आजपर्यंत या समुहाचे एकूण अठरा हजार सदस्य आहेत. दर महिन्याला पुस्तक वाचून उत्कृष्ट परीक्षण करणाऱ्या पहिल्या पाच परीक्षकांना या समुहाच्या मुख्य संयोजिका प्रतिभाताई लोखंडे स्वखर्चाने पोस्टाने पुस्तक भेट पाठवून त्यांचा सन्मान करतात. तसेच शंभर पुस्तकांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांना वाचनयात्री, तर दोनशे पुस्तकांचे परीक्षण करणाऱ्या परीक्षकांना वाचनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. वाचन चळवळीला प्रेरणा देण्याची काम हा समूह करीत असून या समूहाचे मार्गदर्शक शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे,डॉ. लीना निकम, ॲड दिपाली जोशी, सहसंयोजक रवींद्र लटिंगे, कार्याध्यक्ष अंजली गोडसे, उपाध्यक्ष प्रा. कुंडलिक कदम, मनोज अग्रवाल, योगिता मराठे, कोषाध्यक्ष ज्योती कोहळे, प्रसिद्धी प्रमुख कचरू चांभारे, प्रकाश बडदरे,राजू गरमडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


सचिन बेंडभर यांना वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्याचा वाचनयात्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षण आणि साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 6 7 1 6 9
Users Today : 4
Users Yesterday : 7