प्रतिनिधी . संतोष साळुंके
गोमातेचे रक्षण म्हणजे केवळ एका प्राण्याचे संरक्षण नव्हे, तर भारतीय संस्कृती, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि देशी गोवंशाचे अस्तित्व जपण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. याच विचाराला कृतीची जोड देत शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांनी गोसेवा आणि गोसंवर्धनाचा एक प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला आहे. देशी गाईंचे महत्त्व पटवून देत त्यांनी गोशाळेला अनेक देशी गाई दान करून गोवंशाच्या संवर्धनासाठी मोलाचे योगदान दिले आहे.

आजच्या आधुनिक युगात देशी गोवंशाचे महत्त्व हळूहळू दुर्लक्षित होत असताना पैलवान शिवाजी जगताप यांनी देशी गाईंचे जतन, संगोपन आणि त्यांच्या वंशवृद्धीची गरज अधोरेखित केली आहे. केवळ गाईंचे पूजन करून गोसेवा पूर्ण होत नाही, तर त्यांचे संगोपन करणे, त्यांना चारा-पाणी उपलब्ध करून देणे, आजारी जनावरांची काळजी घेणे आणि देशी गोवंशाची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, हीच खरी गोसेवा असल्याचा संदेश त्यांच्या कृतीतून मिळत आहे.

देशी गाई या भारतीय शेती आणि ग्रामीण जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. शेतीला पूरक असणारे शेणखत, नैसर्गिक शेतीला मिळणारे बळ, दुग्धोत्पादन आणि ग्रामीण स्वरूपातील योगदान नसून देशी गोवंशाच्या भविष्यासाठी दिलेली एक महत्त्वपूर्ण देणगी आहे.
देशी गाईंचे महत्त्व शब्दात सांगण्यापेक्षा स्वतः कृतीतून योगदान देऊन पटवून देणे महत्त्वाचे आहे.
शिरूर केसरी पैलवान शिवाजी जगताप यांचा हा उपक्रम समाजाला गोसेवा, गो संरक्षण,गोवंश संवर्धनाचा नवा विचार देणारा ठरत आहे.त्यांच्या या कार्याचा देश देव धर्म या त्रिसूत्री जपणाऱ्या लोकांच्या साठी नक्कीच अनुकरणीय आहे.





Users Today : 6
Users Yesterday : 175