मांडवगण प्रतिनिधी संतोष साळुंखे
शिरूर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथील गावचा मानाचा गणपती सिद्धिविनायक मंदिरामध्ये बाभुळसर बुद्रुक आदर्श सरपंच सौ. दिपाली महेंद्र नागवडे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष महेंद्र हनुमंत नागवडे या उभयताना गणपती मंदिरामध्ये सत्यनारायण महापूजा आणि आरतीचा मान देण्यात आला.

यावेळी सार्वजनिक गणेश उत्सव निमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरपंच दिपाली नागवडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले की सरपंच पदाचा पदभार स्वीकारल्यापासून येणाऱ्या प्रत्येक गणेश उत्सवामध्ये नवीन संकल्पना म्हणूनप्रत्येक सकाळी व संध्याकाळच्या आरतीसाठी गावातील सर्व घटकांमधील विवाहित जोडप्यांना आरतीचा मान देण्यात आला.या संकल्पनेतुन गेले तीन वर्षापासून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.

कार्यक्रम प्रसंगी बहूसंख्येने गणेश भावीक भक्त, महिला भगिनी उपस्थित होत्या. दरवर्षीप्रमाणे यावेळीही सर्वं गणेश भक्त यांना महाप्रसाद लाभ देण्यात आला





Users Today : 0
Users Yesterday : 34