Breaking News
२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा.. आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप

२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी : सागर पवार

भारताचा प्रजनन दर १.९ पर्यंत घसरला असून, लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या २.१ या पातळीपेक्षा तो कमी आहे. बदलती जीवनशैली, करिअरला दिले जाणारे प्राधान्य, उशिरा होणारे विवाह, वाढते वय, ताणतणाव आणि प्रजनन आरोग्याविषयीच्या जागरूकतेचा अभाव यामुळे वंध्यत्वाच्या समस्येत सातत्याने वाढ होत असल्याची चिंता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी झेनिथ ऍडव्हान्स फर्टिलिटी सेंटरतर्फे (Xenith Advanced Fertility Centre) तर्फे १५ जुलै ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत (रविवार वगळून) मोफत फर्टिलिटी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हा उपक्रम केवळ उपचारांपुरता मर्यादित नसून, वंध्यत्वाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करणे, योग्य वयात कुटुंब नियोजनाचे महत्त्व पटवून देणे आणि वेळेवर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास प्रोत्साहन देणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. अनेक जोडपी सामाजिक, मानसिक किंवा आर्थिक संकोचामुळे उपचार घेण्यास विलंब करतात. मात्र, वंध्यत्व ही लाज वाटण्याची बाब नसून इतर आजारांप्रमाणेच ती एक वैद्यकीय समस्या आहे, हा संदेश या शिबिरातून दिला जाणार आहे.

या शिबिरात सहभागी होणाऱ्या जोडप्यांना मोफत नोंदणी, रक्त तपासणी, आयव्हीएफ पॅकेजवर सवलत, तज्ज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन, प्रयोगशाळेतील तपासण्यांवर विशेष सवलत तसेच पुरुषांसाठी मोफत वीर्य तपासणी (Semen Analysis) सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हे शिबिर फॅलोपियन ट्यूबमध्ये अडथळा, अनियमित मासिक पाळी (पीसीओएस/पीसीओडी), वारंवार आयव्हीएफ किंवा आययूआय उपचार अपयशी ठरणे, एंडोमेट्रिओसिस, कारण न समजणारे वंध्यत्व, वारंवार गर्भपात, शुक्राणूंची संख्या कमी किंवा नसणे, शुक्राणूंची हालचाल कमी असणे तसेच बीज निर्मितीतील समस्या असलेल्या जोडप्यांसाठी विशेषतः उपयुक्त ठरणार आहे.

झेनिथ ऍडव्हान्स फर्टिलिटी सेंटरमध्ये महिला व पुरुष वंध्यत्व उपचारांसाठी स्वतंत्र तज्ज्ञ विभाग, अत्याधुनिक उपकरणे, अनुभवी डॉक्टर व भ्रूणतज्ज्ञांची (Embryologists) टीम, २५ वर्षांहून अधिक अनुभव, २५ हजारांहून अधिक कुटुंबांना पालकत्वाचा आनंद, उपचारातील पारदर्शकता आणि प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचार आराखडा ही केंद्राची वैशिष्ट्ये आहेत.

केंद्रामध्ये आयव्हीएफ, आययूआय, आयसीएसआय, डोनर कार्यक्रम, एग फ्रीझिंग, प्रजनन क्षमता वाढविणाऱ्या शस्त्रक्रिया, पीजीटी, पेसा, टेसा, टीईएसई, क्रायोप्रिझर्वेशन, लेझर हॅचिंग आणि लॅपरोस्कोपी यांसारख्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध आहेत.

झेनिथ ऍडव्हान्स फर्टिलिटी सेंटरच्या संस्थापक व संचालक डॉ. ममता दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. १९९२ पासून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि वंध्यत्व निवारण तसेच आयव्हीएफ उपचार क्षेत्रातील २८ वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या डॉ. दिघे यांनी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात आयव्हीएफ विभागाची स्थापना केली होती. त्या भारतातील पहिल्या प्रजनन वैद्यकशास्त्रातील (Reproductive Medicine) मंडळ-प्रमाणित तज्ज्ञांपैकी एक आहेत.

डॉ. ममता दिघे यांच्या मते, आज अनेक जोडपी करिअर आणि आर्थिक स्थैर्याला प्राधान्य देताना पालकत्वाचा निर्णय पुढे ढकलतात. मात्र, विशेषतः महिलांमध्ये वयाच्या तिशीनंतर आणि ३५ वर्षांनंतर प्रजनन क्षमता नैसर्गिकरीत्या कमी होत जाते. त्यामुळे योग्य वेळी प्रजनन आरोग्याची तपासणी करून तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे.

त्यांच्या मते, आधुनिक आयव्हीएफ (कृत्रिम गर्भधारणा) तंत्रज्ञानामुळे वंध्यत्वावर प्रभावी उपचार शक्य झाले आहेत. पूर्वी अशक्य वाटणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या प्रकरणांमध्येही आज यशस्वी गर्भधारणा शक्य होत आहे. बहुअंडाशय विकार (पीसीओएस), गर्भाशयातील अंतःस्तराचा विकार (एन्डोमेट्रिओसिस), वारंवार होणारा गर्भपात, पुरुष वंध्यत्व तसेच वाढते वय अशा अनेक परिस्थितींमध्ये आधुनिक प्रजनन तंत्रज्ञानामुळे लाखो जोडप्यांना पालकत्वाचा आनंद मिळाला आहे.

हे शिबिर वाकड येथील जीओ स्क्वेअर, कस्पटे चौक येथे सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० आणि कोरेगाव पार्क येथील कृष्णा चेंबर्स, जर्मन बेकरीसमोर दुपारी १२.०० ते सायंकाळी ७.३० या वेळेत आयोजित करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी ९१३०७७६७७६, ९१७२३१८६६४ या क्रमांकांवर संपर्क साधावा किंवा www.xenithivf.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन झेनिथ ऍडव्हान्स फर्टिलिटी सेंटरतर्फे करण्यात आले आहे.
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 7 8 7
Users Today : 10
Users Yesterday : 353