Breaking News
२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा.. आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप

पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी:विनायक साबळे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या श्री छत्रपती संभाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कोरेगाव भीमा येथील प्राचार्य अनिल तुकाराम साकोरे यांच्याकडे विद्यमान पुणे विभागप्रमुख पदासोबतच मराठवाडा विभागप्रमुख पदाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे संस्थेच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा गौरव झाला असून शिक्षक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

प्राचार्य साकोरे सर यांनी अत्यंत कमी कालावधीत आपल्या प्रभावी नेतृत्वातून शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासन आणि विद्यालय विकासामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यापूर्वी केंदूर येथील विद्यालयात त्यांनी केलेला कायापालट तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न विशेष ठरले होते. सध्या कोरेगाव भीमा येथील विद्यालयातील त्यांच्या कार्याची दखल घेत संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व कौस्तुभ गावडे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी त्यांच्यावर मराठवाडा विभागाचीही जबाबदारी सोपविली आहे. या विभागात २१ शाळांचा समावेश आहे.

पुणे आणि मराठवाडा या दोन्ही विभागांचा विभागप्रमुख म्हणून साकोरे सर यांची झालेली नियुक्ती हा त्यांना मिळालेला मोठा सन्मान मानला जात असून, विद्यालयातील गुरुदेव कार्यकर्ते, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

 

यावेळी स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे, सदस्य बबुशा ढेरंगे, महादेव फडतरे आणि बापूसाहेब शिंदे यांनी कोरेगाव भीमा ग्रामस्थांच्या वतीने प्राचार्य साकोरे सर यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 7 8 7
Users Today : 10
Users Yesterday : 353