Breaking News
२५ जुलै – जागतिक आयव्हीएफ दिन भारताचा घसरता प्रजनन दर चिंतेचा विषय; वंध्यत्वावरील जनजागृतीसाठी झेनिथ अॅडव्हान्स फर्टिलिटी सेंटरचा पुढाकार पुणे विभागासह मराठवाडा विभागाचीही जबाबदारी प्राचार्य अनिल साकोरे यांच्याकडे स्पर्धेपेक्षा सेवाभावाचा विजय! दोन रुग्णालयांच्या समन्वयातून मृत्यूच्या उंबरठ्यावरून रुग्णाला मिळाले नवजीवन विषय २ : मृत्यूशी दोन तासांची झुंज… डॉक्टरांची धडपड, दोन रुग्णालयांचा समन्वय आणि एका कुटुंबाच्या आशेचा पुनर्जन्म हार्ट अटॅक आलेल्या तरुणाचे सीपीआर देऊन प्राण वाचवणाऱ्या डॉ. अतुल सुराणा यांचा सत्कार लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा.. आषाढी एकादशी निमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन व ओन्ली वुमन्स जिमचा सेवाभावी उपक्रम; शेकडो भाविकांना फराळाचे वाटप

लोणीकंदच्या निवासी मतिमंद विद्यालयात उत्साहात पालखी सोहळा..

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा: प्रतिनिधी: विनायक साबळे

लोणीकंद, ता. हवेली येथील सन्मित्र शिक्षण मंडळाच्या निवासी मतिमंद विद्यालयात आषाढी वारीचे औचित्य साधून पालखी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विशेष मुलांना वारकरी परंपरा, भक्ती आणि संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.

विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ३० बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना वारकरी, भगवान विठ्ठल आणि माता रखुमाई यांच्या आकर्षक वेशभूषेत सजविण्यात आले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात पालखीची मिरवणूक काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यालय परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.

या प्रसंगी संस्थेच्या सचिव राजश्री तापकीर, मुख्याध्यापक अंकुश घटमाळ, विशेष शिक्षक संभाजी सोमवारे, कला शिक्षक विक्रम जवळकर तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 4 7 8 6
Users Today : 9
Users Yesterday : 353