शिरूर:प्रतिनिधी
शिरूर जिल्हा पुणे येथे दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ते २ मार्च दरम्यान भव्य”श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
श्री शिव महापुराण कथा कार्यक्रम हा उद्योगपती स्व.रसिकलाल धारिवाल नगरी रामलिंग रोड,शिरुर जिल्हा पुणे येथे मंगळवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ ते सोमवार दिनांक २ मार्च २६ या कालावधीत दररोज दुपारी एक ते सायंकाळी चार या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे आयोजन पी. आर. धारिवाल फाउंडेशन चे उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल व युवा उद्योजक आदित्य धारिवाल यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्यप्रसंग, शिवतत्त्वज्ञान, भक्तीमार्ग, तसेच जीवनातील सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या प्रेरणादायी कथा भक्तांना ऐकण्यास मिळणार आहेत.
सदर कार्यक्रमाचे आयोजन रामलिंग रोड, शिरूर ग्रामीण येथे करण्यात आले आहे.
या पवित्र कथेसाठी शिरूर परिसरातील तसेच पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी सर्व शिवभक्तांना केले आहे.
या”सर्व विघ्नहर, सर्व मंगलमय अशा या धार्मिक सोहळ्यासाठी आपण सहपरिवार उपस्थित राहावे आणि श्री शिवमहापुराण कथामृताचा लाभ घ्यावा.” या भव्य आयोजनासाठी धारिवाल परिवार उद्योगपती प्रकाशभाऊ धारिवाल,दिनाभाभी धारिवाल, आदित्य धारिवाल यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

शिवकृपा, भक्तीभाव आणि अध्यात्मिक उन्नतीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात सर्वांनी सहभागी होऊन पुण्यलाभ घ्यावा, असे आवाहन प्रकाशभाऊ धारिवाल यांनी केले आहे.





Users Today : 3
Users Yesterday : 77