पुणे प्रतिनिधी : सागर पवार
पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील प्रचारानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सुतारवाडी येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.
आबासाहेब सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली ही पदयात्रा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पदयात्रेदरम्यान सुतारवाडीतील नागरिकांनी जिव्हाळ्याने स्वागत करत घड्याळ चिन्हासोबत ठाम पाठिंबा व्यक्त केला. नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पदयात्रेला विशेष ऊर्जा देणारा ठरला.

पदयात्रेनंतर भैरवनाथ मंदिर, सुतारवाडी येथे सभा संपन्न झाली.
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अधिकृत सहउमेदवार सौ. गायत्री मेढे–कोकाटे, बाबुराव चांदेरे, सौ. पार्वती निम्हण आणि श्री. अमोल बालवडकर उपस्थित होते. यावेळी बालम सुतार आणि संतोष तोंडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. सर्वांनी नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अपेक्षा तसेच विकासाबाबतच्या भावना जाणून घेतल्या.
कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या शिस्तबद्ध सहभागामुळे हा कार्यक्रम प्रभावी ठरला.
येणाऱ्या निवडणुकीत विकास, पारदर्शकता आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर आम्हा चौघांनाही प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित नागरिकांना करण्यात आले.
सुतारवाडीतील नागरिकांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.







Users Today : 6
Users Yesterday : 7