संग्राम हॉटेलसमोर कंटेनरची कारला धडक; त्यानंतर शिवाई बसही धडकली … मोटारसायकलस्वाराचाही दुर्दैवी अंत

शिरूर प्रतिनिधी: शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर आज मंगळवार दि.११/०८/२०२६ रोजी संध्याकाळी ५च्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात वाडेगव्हाण येथील उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांच्यासह मोटारसायकलस्वार प्रथमेश प्रकाश लाड रा. कुंडल ता. पलूस जि. सांगली यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती शिरूर पोलिसांनी दिली आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर बायपासवरील … Read more

राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत राजमाता जिजाऊ आखाड्याचा डंका!

प्रतिनिधी. संतोष साळुंके मांडवगण फराटा येथील विद्यार्थ्यांची दैदिप्यमान कामगिरी; २ सुवर्ण, ७ रौप्य व ९ कांस्य पदकांची कमाई :नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत मांडवगण फराटा येथील राजमाता जिजाऊ आखाड्यातील विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले. विविध साहसी आणि पारंपरिक युद्धकला क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होत आखाड्यातील विद्यार्थ्यांनी तब्बल २ सुवर्ण, ७ … Read more

आपटीच्या बेपत्ता महिलेचा पाच दिवसांनी भीमा नदीत मृतदेह दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून झाली होती बेपत्ता; ड्रोनसह अग्निशमन दल, आपदामित्रांच्या मदतीने शोधमोहीम

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी: विनायक साबळे आपटी (ता. शिरूर) येथील दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून ४ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या निकिता अविनाश गाडेकर (वय २५) या महिलेचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्ती परिसरात भीमा नदीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेने आपटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. निकिता गाडेकर या ४ ऑगस्ट रोजी घरातून … Read more