Breaking News
संग्राम हॉटेलसमोर कंटेनरची कारला धडक; त्यानंतर शिवाई बसही धडकली … मोटारसायकलस्वाराचाही दुर्दैवी अंत राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत राजमाता जिजाऊ आखाड्याचा डंका! आपटीच्या बेपत्ता महिलेचा पाच दिवसांनी भीमा नदीत मृतदेह दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून झाली होती बेपत्ता; ड्रोनसह अग्निशमन दल, आपदामित्रांच्या मदतीने शोधमोहीम आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक स्मारकांमध्ये विविध उपक्रमांनी क्रांतिकारकांना अभिवादन सणसवाडीत गावठी पिस्तूल बाळगणाऱ्यास अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; दोन जिवंत काडतुसे, स्विफ्ट कारसह ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.. शिरूर सतरा कमानी पुलावरून घोडनदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आणि ओळख पटली

आपटीच्या बेपत्ता महिलेचा पाच दिवसांनी भीमा नदीत मृतदेह दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून झाली होती बेपत्ता; ड्रोनसह अग्निशमन दल, आपदामित्रांच्या मदतीने शोधमोहीम

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भिमा:प्रतिनिधी: विनायक साबळे

आपटी (ता. शिरूर) येथील दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून ४ ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेल्या निकिता अविनाश गाडेकर (वय २५) या महिलेचा मृतदेह तब्बल पाच दिवसांनी कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्ती परिसरात भीमा नदीच्या पाण्यात आढळून आला. या घटनेने आपटी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

निकिता गाडेकर या ४ ऑगस्ट रोजी घरातून बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. तपासादरम्यान एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात निकिता या भीमा नदीच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. तसेच वढू बुद्रुक येथील भीमा नदीवरील बंधाऱ्यावरून एका महिलेने नदीत उडी मारल्याचे काही नागरिकांनी पाहिल्याचे पोलिसांना सांगितले.

या माहितीच्या आधारे शिक्रापूर पोलिसांनी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलातील जवान, आपदामित्र तसेच इतर यंत्रणांच्या मदतीने भीमा नदीपात्रात व्यापक शोधमोहीम राबवली. ड्रोनच्या सहाय्यानेही नदीपात्र व परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, सुरुवातीच्या शोधमोहिमेत महिलेचा ठावठिकाणा लागला नाही.

दरम्यान, ९ ऑगस्ट रोजी कोरेगाव भीमा येथील फडतरे वस्ती परिसरात काही नागरिक नदीकडे गेले असता त्यांना पाण्यावर एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार श्रावण गुपचे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख निकिता अविनाश गाडेकर अशी पटली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अविनाश भगवान गाडेकर (वय ३०, रा. आपटी, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिक्रापूर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहेत.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 8 3 6 9
Users Today : 225
Users Yesterday : 787