Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

रांजणगाव येथे शिरूर तालुका व्यापारी संघटनेचा भव्य मेळावा संपन्न.

Facebook
Twitter
WhatsApp

सरदवाडी प्रतिनिधी: दतात्रय कर्डिले:

पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटना संलग्न, शिरूर तालुका व्यापारी संघातर्फे रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपतीच्या सान्निध्यात, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे संस्थापक, अध्यक्ष सचिन निवंगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापारी वर्गासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीपदादा कंद, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाचे अध्यक्ष सचिन निवंगुणे,घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादापाटील फराटे, सूर्या इलेक्ट्रॉनिक्सचे रमेश चौधरी, ऊर्जा उद्योग समूहाचे प्रकाश कुतवळ,श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष तसेच शरदचंद्र सहकारी पतसंस्था शिरूर संचालक प्रितेश गादिया, पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी नवनाथ सोमसे, उपाध्यक्ष धाडसी बापू गायकवाड, पुणे खराडी अध्यक्ष बाळासाहेब केंजळे, राजेश आग्रवाल, सेक्रेटरी संतोष काळे, शहर जनरल सेक्रेटरी दत्ताभाऊ जाधव, उपाध्यक्ष रीजवान खान, उपाध्यक्ष खरताराम चौधरी, नाना भानगिरे, युवा उदयोजग संदेश देसरडा,ऋषभ मुथा, शिक्रापूर रोटरी क्लब चे अध्यक्ष मिलींद भोसूरे यांच्यासह रांजणगाव चे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य शिरूर तालुक्यातील व्यापारी, मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात शिरूर तालुक्यातील उद्योजक व व्यापाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले त्यामध्ये उत्कृष्ट व्यापारी पुरस्कार-रविंद्र चौरसिया/सुनिल चौरसिया, शिक्रापुर उत्कृष्ट महीला व्यापारी पुरस्कार – वर्षा काळे शिरूर, पुष्पा राजाराम शिंदे तळेगाव ढमढेरे, युथ बिजनेस आयकाॅन– मनोज खेडकर, थ्री इलेक्ट्रॉनिक रांजणगाव, सिद्धार्थ चाबुकस्वार शिरूर, जेष्ठ व्यापारी पुरस्कार– रमेश सुराना मांडवगण, कृतज्ञता व्यापारी पुरस्कार- प्रकाश कुतवळ, उर्जा उद्योग समुह तसेच उत्कृष्ट व्यापारी संघटना म्हणून पाबळ व्यापारी संघटनेला सन्मानित करण्यात आले.

 

पुणे “जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून विविध योजना राबविण्याचा तसेच पुढील काळात बँकेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांसाठी कर्ज संबंधी सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन प्रदीपदादा कंद यांनी दिले .तसेच आपल्या संघटनेचे काम गाव पातळीवरून देश पातळीवर पोहचले आहे याचे कौतुक केले.

कामगार कसे टिकले पाहीजे, व्यवसाय कसा वाढवावा, कशा पद्धतीने नियोजन करावे व स्वास्थ्य टिकून व्यवसाय करावा या संदर्भात सुर्या इलेक्ट्रॉनिकचे मालक जेष्ठ उद्योजक रमेश चौधरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब फराटे यांनी बोलताना सांगितले की, आम्ही सहकार खात्यात काम करतो परंतु छोट्या व्यापारी वर्गाला गाव पातळीवर व्यवसाय करत असताना खुप अवघड असते, उर्जा डेरीचे सर्वेसर्वा प्रकाश कुतवळ यांनी छोटा व्यवसाय कसा मोठा करावा व प्रत्येक कार्यात कशी उर्जा वाढवावी तसेच स्वतःच्या ब्रँडचे मार्केटींग कसे करावे याचे उदाहरण दिले,श्री ऑल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फ्रेंस राष्ट्रीय युवा उपाध्यक्ष व शरदचंद्र सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रितेश गादिया व शिवसेना नेते बापूसाहेब शिंदे यांनी व्यापारी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले.

 

यावेळी शिरूर तालुक्याचे अध्यक्ष किरण शिंदे, कार्याध्यक्ष हरीमामा फराटे, उपाध्यक्ष अशोक शहाणे, कोषाध्यक्ष लधाराम पटेल, सेक्रेटरी शौकत भाई इनामदार, उपाध्यक्ष प्रदिप मैड, सेक्रेटरी कमलेश बुरांडे, सल्लागार बाळासाहेब चौधरी तसेच स्थानिक रांजणगाव संघटना, प्रकाश मसाले,  बाबा जाधव मसाले बाॅम्बीनो पास्टा यांनी विषेश सहकार्य करून मेळाव्याचे आयोजन यशस्वीपणे पार पडले.

या कार्यक्रमाची प्रस्तावना तालुका अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली, सूत्रसंचालन पुणे शहर अध्यक्ष अजित चंगेडीया यांनी केले तर आभार रांजणगाव ट्रस्ट अध्यक्षा स्वाती पाचुंदकर यांनी केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 6 0
Users Today : 198
Users Yesterday : 503